सखी मंच सदस्य नोंदणी आजपासून होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:30 AM2021-03-10T04:30:17+5:302021-03-10T04:30:17+5:30

गोंदिया : महाराष्ट्र आणि गोव्यातील महिलांचा लोकप्रिय मंच म्हणून लोकमत सखी मंचची ओळख निर्माण झाली आहे. दरवर्षी या व्यासपीठाशी ...

Sakhi Manch member registration will start from today | सखी मंच सदस्य नोंदणी आजपासून होणार सुरू

सखी मंच सदस्य नोंदणी आजपासून होणार सुरू

googlenewsNext

गोंदिया : महाराष्ट्र आणि गोव्यातील महिलांचा लोकप्रिय मंच म्हणून लोकमत सखी मंचची ओळख निर्माण झाली आहे. दरवर्षी या व्यासपीठाशी जुळण्यासाठी महिलांना उत्सुकता लागलेली असते. वर्ष २०२१ सखी मंचची सदस्यता नोंदणी करण्याची सखींची प्रतीक्षा संपलेली असून, सदस्य नोंदणीला सुरुवात झाली आहे.

लोकमत सखी मंचची सदस्य नोंदणी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महिलांना लवकरात लवकर करून घ्यायची आहे. महिलांनी आपापल्या लोकमत सखी मंचच्या वॉर्ड प्रतिनिधी तालुकानिहाय व शहरनिहाय संपर्क करून आपली सदस्य नोंदणी अ‍ॅडव्हान्समध्ये बुकिंग करून घ्यावी. गोंदिया शहर विभागाकरिता सदस्य नोंदणी शुल्क ५०० रुपये व तालुका विभागाकरिता ३५० रुपये नोंदणी शुल्क जमा करून अ‍ॅडव्हान्स बुकिंग करता येणार आहे. आकर्षक भेटवस्तू रूपात प्रत्येकाला बाथरूम किट व ओळखपत्र मिळणार आहे. लवकरात लवकर सखींनी आपल्या विभागातील विभाग प्रतिनिधी, वाॅर्ड प्रतिनिधींशी संपर्क करून सदस्यता नोंदणी शुल्क जमा करून आपली सदस्य नोंदणी निश्चित करून घ्यावी. अ‍ॅडव्हान्स बुकिंग केल्याशिवाय नोंदणी मान्य केली जाणार नाही. अधिक माहितीकरिता ९८२३१८२३६७, ९४२१०६४७२२ यांच्याशी संपर्क साधावा.

सखी मंचच्या वॉर्ड प्रतिनिधींचे संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे दिलेले आहेत.

गोंदिया शहराकरिता रेखा कुर्वे, गजानन कॉलनी (७९७२५४९७६३), सुरेखा भेंडारकर, फुलचूर (९८२३५०५५६५), मीना डुंभरे, गणेशनगर (९९२२०१२३००), आम्रपाली बनकर, सिव्हिल लाइन (९७६५०९६०७९), अर्चना माहुरे, रिंग रोड (७९७२१६७१०९), श्रद्धा बोरीकर, गोंदिया हॉस्पिटल (बजरंग वॉर्ड) (९६३७५९५९६२), रुचिका हलमारे बाजपेयी वॉर्ड (७२१८७१९४६०), मनीषा कुंभरे, पोलीस हेडक्वॉर्टर, कारंजा (९६७३१५१६२२), पिंकी गणवीर कुंभारेनगर नाना चौक (७०३८३७२१४५), ललिता ताराम, साई माऊली कॉलनी (सेल टेक्स कॉलनी) (८६६८९४०१६७), अर्चना ठवरे, शास्त्री वॉर्ड (गोल्ड सिनेमा) (९७६५८७११४१), सुनंदा बावनकर एलआयसी ऑफिस गणेशनगर (८७८८८५३८६६), पूजा टेंभरे, बाजपेयी वॉर्ड, खंडेलवाल राईस मिल (७७९८२२९३३३), दीपा काशीवार, गणेशनगर (८६६८५३३०४८), कल्पना गोरखे, सेलटॅक्स कॉलनी, फुलचूरटोला (९४२१८११२६९), मित्तल बैस, बम्लेश्वरी कॉलनी, फुलचूर नाका (७९७२१३२६४४), रूपाली रोकडे श्रीनगर (९४०५२४२०३०).

तालुकानिहाय : गोरेगाव- वैशाली कोठेवार (९०४९६४०५८३), हर्षा घोंगडे (९७६४५०८५३१), आमगाव- मंगला सिंगाडे (८००७८१९४३४), रूपम शर्मा (८८३९२१५९२५), सडक अर्जुनी - प्रमिला कोरे (८३२९७३६१११), सौंदड- मंजू डोंगरवार (८०५५९२२३३३), देवरी- सिमरण जांगडे (९३२५१००२७८). सालेकसा - किरण मोरे (९०११७७०८१०), साखरीटोला- इंदू कोरे (८५५४९६११५४), अर्जुनी मोरगाव- रोहिणी कुंभरे (९५२७०८३८१०), नवेगावबांध- सपना उजवने (७९७२५११६५७), तिरोडा- संयोजिका ममता दुबे (९३७२८९६६०१), सहसंयोजिका लता गेडाम (७०२८२९९९८८) यांच्याशी संपर्क साधता येईल.

सुवर्णसंधी

मागील वर्षी ज्या महिला सदस्य नोंदणीपासून वंचित राहिल्या त्याकरिता सदस्य नोंदणीची ही सुवर्णसंधी महिलांना यावर्षी मिळणार आहे. करिता मोठ्या संख्येने महिलांनी सदस्य नोंदणी करावी.

हिरल माळ कूपन प्रत्येकाला व लक्की ड्राॅमध्ये ५ नेकलेस जिंकण्याची संधी

सखी मंच सदस्यता नोंदणी करणाऱ्या सर्वांना हिरल गारमेन्ट्स रिंग रोड गोंदियाच्या वतीने हिरल माळ देण्यात येणार आहे. सखींना कूपन घेऊन माळ मिळविता येणार आहे. सोबतच नोंदणीच्या अखेरीस लक्की ड्राॅमध्ये ५ एक्झिक्युटिव्ह नेकलेस जिंकण्याची सुवर्णसंधी यात मिळणार आहे.

Web Title: Sakhi Manch member registration will start from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.