शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील ‘गोबरगॅस’ कालबाह्य

By admin | Updated: May 11, 2015 00:33 IST

ग्रामीण भागात शेतीच्या कामात ट्रॅक्टरसह दुसऱ्या यंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने शेतकऱ्यांना जनावरांना...

गोंदिया : ग्रामीण भागात शेतीच्या कामात ट्रॅक्टरसह दुसऱ्या यंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने शेतकऱ्यांना जनावरांना पाळणे कठीण झाले आहे. परिणामी ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी एकेकाळी महत्त्वाचा घटक असणारा ‘गोबर गॅस’ आज कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे.भारताला कृषी प्रधान देश म्हणून ओळखल्या जाते. त्यामुळे देशात ७५ टक्के शेती व्यवसाय केला जातो. पूर्वी घरोघरी शेतकऱ्याकडे शेतीच्या उपयोगासाठी बैलासह दुधाळ जनावरे मोठ्या प्रमाणात असायची. शेतीसुद्धा संसाराच्या उपयोगाची होती. ज्यांच्या घरी शेती आहे, अशा बहुतांश शेतकऱ्यांच्या घरी गोबरगॅस सयंत्र बसविली गेली होती. त्यामुळे पाळीव जनावरांपासून दूध तर शेणापासून घरगुती वापरासाठी गॅस मिळत होता. झिरो मेन्टनन्समुळे गोबरगॅस सयंत्राचा वापर वाढला होता.पण कालांतराने पाणी टंचाई, वैरण टंचाईमुळे तथा प्रागतिक साधने वाढल्यामुळे तसेच शेतीच्या यांत्रिक सामुग्रीत आधुनिकता आल्यामुळे गाई- बैलांचा वापर शेतीसाठी कमी प्रमाणात करण्यात येत आहे. त्यामुळे गाई- बैलांचे महत्व दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. वनातील अवैध वृक्षतोडीमुळे जलस्तराचे प्रमाणही कमी होत आहे. परिणामत: जनावरांना आवश्यक असलेल्या वैरणाची टंचाईदेखील मोठ्या प्रमाणावर आहे. पशुधनाच्या अभावामुळे गोबर गॅस कमी झाले आहे.दिवसेंदिवस निर्माण होत असलेली पाणी व चारा टंचाईमुळे शेतकरी जनावरांना मिळेल त्या किंमतीत विक्री करीत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या घराघरात असणारा ‘गोबरगॅस’ सयंत्र आज ग्रामीण भागातून कालबाह्य झाले आहेत. तर त्याची जागा आता गॅस सिलिंडरने घेतली आहे. कमी खर्चात संपूर्ण कुटुंबाची गरज पुर्ण करणारे इंधन या गोबरगॅस मधून मिळायचे. परंतु गोबर गॅसमध्ये टाकलेले शेण कालविण्याच्या पध्दतीमुळे अनेकांनी या गोबरगॅसकडे दुर्लक्ष करून सिलींडरच्या गॅसला पसंती दिली आहे. ग्रामीण भागातीलही गोबरगॅस दिसेनासे झाले. (तालुका प्रतिनिधी)