युवक-युवतीचे मृतदेह अफवाच

By Admin | Updated: July 19, 2016 02:12 IST2016-07-19T02:12:47+5:302016-07-19T02:12:47+5:30

गंगाझरी पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या सहेसपूर-गंगाझरी व दवनीवाडा पो.स्टे.अंतर्गत येणाऱ्या खळबंदा जंगल

The rumors of the young man's body | युवक-युवतीचे मृतदेह अफवाच

युवक-युवतीचे मृतदेह अफवाच

एकोडी : गंगाझरी पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या सहेसपूर-गंगाझरी व दवनीवाडा पो.स्टे.अंतर्गत येणाऱ्या खळबंदा जंगल परिसरात युवक-युवतींची हत्या करुन त्यांचे मृतदेह फेकण्यात आल्याची अफवा पसरली. त्यामुळे लगतच्या गावांत एखच खळबळ उडाली. अनेकांनी जंगल परिसरात त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण काहीही आढळले नाही.
रविवारी सायंकाळच्या सुमारास सहेसपूर येथे खळबंदा जंगल परिसरात युवक-युवतीची हत्या करुन त्यांचे मृतदेह फेकल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे अनेक प्रकारचे तर्क-वितर्क लावत गावकऱ्यांनी जंगलात जाऊन सायंकाळपर्यंत शोध घेतला. परंतु त्या परिसरात असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे दिसून आले. या प्रकरणाबाबत कोणतीही माहिती गंगाझरी किंवा दवनीवाडा पोलिसात नव्हती.
अशाच प्रकारची अफवा तीन वर्षाअगोदर पसरली होती. त्यावेळी गंगाझरी पोलिसांनी याच परिसरात तीन ते चार दिवस जंगलात शोध घेतला होता. त्यावेळी सुद्धा काहीच हाती लागले नव्हते. आताची चर्चाही अफवा असून त्यात सत्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (वार्ताहर)

युवक-युवतींचा वावर
खळबंदा जलाशयाचे मनोहारी दृष्य पाहण्याच्या उद्देशाने अनेक कॉलेजचे युवक-युवती या परिसरात मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे एखाद्या प्रेमी युगलाची हत्या होण्याची घटना सत्य असू शकते, असा नागरिकांचा लवकर विश्वास बसतो. मात्र अशा अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी याबाबत अधिक सतर्क राहावे असे आवाहन जागरूक नागरिकांनी केले.

Web Title: The rumors of the young man's body