शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
3
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
4
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
5
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
6
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
7
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
8
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
9
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
10
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
11
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
12
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
13
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
14
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
15
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
16
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
17
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
18
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
19
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
20
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...

९०३ विद्यार्थ्यांचा आरटीई प्रवेश अडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:00 IST

हजारो पालक आपल्या पाल्यांना या २५ टक्के प्रवेशात क्रमांक लागावा यासाठी धडपडत आहेत. ११ ते २८ फेब्रुवारी या दरम्यान जिल्ह्यात ९०३ जागेसाठी ३ हजार ६५८ अर्ज करण्यात आले होते.२५ टक्के मोफत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी ११ ते २९ फेब्रुवारी २०२० या दरम्यान पालकांनी पोर्टलवर जाऊन ऑनलाईन नोंदणी केली होती. त्या अर्जाची सोडत १७ मार्च रोजी ऑनलाईन पध्दतीने करण्यात आली.

ठळक मुद्देआता प्रतीक्षा सूचनेची : प्रवेशाचे नियोजन नाही, पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद आहे. गोंदिया राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी ११ ते २९ फेब्रुवारी या १९ दिवसात पुढच्या वर्षासाठी अर्ज करण्याची मुदत दिली होती. यात जिल्ह्यातील ९०३ जागांसाठी ३ हजार ६५८ अर्ज आले आहेत. त्या मोफत प्रवेशाची सोडत ऑनलाईन पध्दतीने १७ मार्च रोजी करण्यात आली. यात ९०३ जणांचा प्रवेश निश्चीत करण्यासाठी त्यांना ३१ मार्च ही मुदत देण्यात आली होती. परंतु १३ मे येऊनही विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली नाही.हजारो पालक आपल्या पाल्यांना या २५ टक्के प्रवेशात क्रमांक लागावा यासाठी धडपडत आहेत. ११ ते २८ फेब्रुवारी या दरम्यान जिल्ह्यात ९०३ जागेसाठी ३ हजार ६५८ अर्ज करण्यात आले होते.२५ टक्के मोफत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी ११ ते २९ फेब्रुवारी २०२० या दरम्यान पालकांनी पोर्टलवर जाऊन ऑनलाईन नोंदणी केली होती. त्या अर्जाची सोडत १७ मार्च रोजी ऑनलाईन पध्दतीने करण्यात आली.जिल्ह्यातील १४० शाळांनी यासाठी नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश मिळणार आहे. आमगाव तालुक्यातील ११ शाळांमध्ये ८७ जागेसाठी ४०६ अर्ज, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १३ शाळांमधील ९१ जागेसाठी २४५ अर्ज, देवरी तालुक्यातील १० शाळांमधील ५५ जागेसाठी १६१ अर्ज, गोंदिया तालुक्यातील ५७ शाळांमधील ३५६ जागेसाठी १ हजार ८२६ अर्ज करण्यात आले आहेत. गोरेगाव तालुक्यातील १५ शाळांमधील ७४ जागेसाठी २९८ अर्ज, सडक-अर्जुनी तालुक्यातील १० शाळांमधील ४५ जागेसाठी १४५ अर्ज, सालेकसा तालुक्यातील ५ शाळांमधील ४४ जागेसाठी ११८ अर्ज, तिरोडा तालुक्यातील १९ शाळांमधील १५१ जागेसाठी ४५९ अर्ज करण्यात आले आहेत.एकूण १४० शाळांमधील ९०३ जागेसाठी ३ हजार ६५८ अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यांची लॉटरी ऑनलाईन पध्दतीने काढण्यात आली. ज्या पाल्यांचे नंबर लागले त्यांच्या पालकांच्या मोबाईलवर संदेश पाठविण्यात आले. सोबत प्रतीक्षा यादी देखील दिली आहे. परंतु कोरोना संसर्गामुळे फेब्रुवारी महिन्यात होणारे अ‍ॅडमिशन मे महिना अर्धा होऊनही निश्चीत झाले नाही. समग्र शिक्षा अभियानाच्या जेव्हापर्यंत सूचना येत नाही तेव्हापर्यंत कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी पालकांना शाळेत जाता येणार नाही.ग्रीन झोनमध्ये कागदपत्रांची पडताळणी कराआरटीई कायद्यांतर्गत ज्या पाल्यांना २५ टक्के मोफत प्रवेशासाठी लॉटरी लागली त्यांच्या पालकांना संबंधित शाळेत जाऊन कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलवणे गरजेचे आहे.जे जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत. त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या पालकांना संबंधित शाळेत जाण्याच्या सूचना देणे आवश्यक आहे. दोन महिने उशीर झालेल्या या २५ टक्के आरटीई प्रवेशाला आता सुरूवात करावी अशी मागणी पालकांकडून होत आहे.

टॅग्स :Educationशिक्षण