आरटीई प्रवेश संकटात ; दोन वर्षांपासून शासनाकडून एकही पैसा मिळाला नाही (डमी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:47 IST2021-02-05T07:47:47+5:302021-02-05T07:47:47+5:30
गोंदिया : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार वंचित व दुर्बल ...

आरटीई प्रवेश संकटात ; दोन वर्षांपासून शासनाकडून एकही पैसा मिळाला नाही (डमी)
गोंदिया : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद आहे. यासाठी शासन खासगी शाळांना आरटीई प्रवेशाचे पैसे देते. परंतु मागील दोन वर्षांपासून एकही रक्कम न दिल्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार किंवा नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरटीईसाठी गोंदिया जिल्ह्याला सन २०१९-२० व सन २०२०-२१ या शैक्षणिक सत्रासाठी शासनाने कवडीही न दिल्यामुळे बालकांना पुढच्या सत्रात प्रवेश मिळेल किंवा नाही हे सांगता येत नाही. सन २०१९-२० या शैक्षणिक सत्रासाठी ७ कोटी ९२ लाख ३२ हजार २८० रुपये शासनाकडे मागणी करण्यात आली, परंतु यापैकी एकही रक्कम मिळाली नाही. सन २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात कोराेनाचा संसर्ग असल्याने आरटीईचा प्रवेश तर झाला. परंतु शिक्षण देण्यात आले नाही. गोंदिया जिल्ह्यातील १४३ शाळांत आरटीईचा प्रवेश देण्यात आला आहे. एका विद्यार्थ्यामागे खासगी शाळांना शासन १७ हजार ६७० रुपये देत असते.
बॉक्स
२०१७-१८ मध्ये मिळाले २ कोटी
गोंदिया जिल्ह्यात सन २०१७-१८ या वर्षात ४ कोटी २२ लाख ३३ हजार ६३७ रुपयांची मागणी करण्यात आली होती. परंतु दोन कोटी रुपये देण्यात आले होते. त्यापैकी ५० टक्केच रक्कम वाटप करावी असे शासनाचे निर्देश असल्याने १ कोटी ९० लाख ४ हजार ३०५ रुपये वाटप करण्यात आले.
..........
२०१८-१९ मध्ये मिळाले २.६० कोटी
गोंदिया जिल्ह्यात सन २०१८-१९ या वर्षात ६ कोटी ११ लाख ११ हजार ८३६ रुपयांची मागणी करण्यात आली होती. परंतु दोन कोटी ५९ लाख ९१ हजार रुपये देण्यात आले होते. त्यापैकी २ कोटी ५८ लाख ५९ हजार ५४४ रुपये वाटप करण्यात आले.
.........
२०१९-२० मध्ये एकही निधी नाही
गोंदिया जिल्ह्यात सन २०१९-२० या वर्षात ७ कोटी ९२ लाख ३२ हजार २८० रुपयांची मागणी करण्यात आली होती.
परंतु शासनाने कवडीचाही निधी देण्यात आला नाही. त्यामुळे आरटीईच्या पैशाला घेऊन संस्था संचालकांत असंतोषाचे वातावरण आहे.........
कोट
मागील दोन वर्षांचा आरटीईचा निधी आला नसल्याने हा निधी वाटप करण्यात आला नाही. सन २०१८-१९ या वर्षापर्यंत मागच्या दोन वर्षांचे ५० टक्के पैसे वाटप करण्यात आले आहेत. आमच्याकडे एकही निधी शिल्लक नाही.
राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी गोंदिया.
........
जिल्ह्यात आरटीईच्या शाळा -१४२
सन २०१७-१८-९३८
सन २०१८-१९-९८२
सन २०१९-२०-९७५
सन २०२०-२१-८८२