एसीबीने उघडकीस आणली २.३२ कोटींची अपसंपदा

By Admin | Updated: July 18, 2014 00:08 IST2014-07-18T00:08:38+5:302014-07-18T00:08:38+5:30

काम करून देण्यासाठी चहा-पाण्याच्या नावावर सुरू असलेल्या गैरव्यवहारांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करडी नजर ठेऊन आहे. जिल्ह्यात अशा २४ व्यवहारांवर या विभागाने कारवाई करून

Rs 2.32 crore apocalypse exposed by ACB | एसीबीने उघडकीस आणली २.३२ कोटींची अपसंपदा

एसीबीने उघडकीस आणली २.३२ कोटींची अपसंपदा

कारवायांचे फलित : सर्वाधिक संपत्ती पऱ्हाटेंकडे, बहुतांश प्रकरणे न्यायालयात प्रलंबित
कपिल केकत - गोंदिया
काम करून देण्यासाठी चहा-पाण्याच्या नावावर सुरू असलेल्या गैरव्यवहारांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करडी नजर ठेऊन आहे. जिल्ह्यात अशा २४ व्यवहारांवर या विभागाने कारवाई करून त्यातून दोन कोटी ३१ लाख ७८ हजार ८९९ रूपयांची अपसंपदा उघडकीस आणली आहे. विशेष म्हणजे यामध्ये सर्वाधिक संपत्ती अभियंता दीपक पऱ्हाटे यांची असल्याचे दिसते.
एखाद्या शासकीय किंवा खाजगी कार्यालयातील अडलेले काम करवून घेण्यासाठी त्या मोदबल्यात संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडून पैसा मागणे ही सामान्य बाब झाली आहे. कायद्याच्या भाषेत याला ‘लाच’ म्हटले जाते. आजघडीला हा प्रकार दररोजच्या व्यवहारातील एक भाग झाला आहे. लाच न मागता क्वचितच कुणी कामे करून देत असतील यावर सर्वसामान्यांचा विश्वासच बसणार नाही अशी स्थिती झाली आहे. या लाच मागणाऱ्यांवर लगाम घालून असे व्यवहार संपुष्टात यावे यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची स्थापना करण्यात आली आहे.
एखाद्या कामाच्या मोबदल्यात अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास संबंधित व्यक्तीने विभागाकडे तक्रार करायली हवी. मात्र असे केल्यास समोरचा अधिकारी किंवा कर्मचारी आपली ‘खुन्नस’ ठेवणार व आपले काम होऊ देणार नाही अशी भिती मनात ठेऊन नागरिक तक्रार करण्यास घाबरतात. त्यामुळे चहा-पाण्याचा हा व्यवहार एक औपचारिकताच झाला आहे. याला घालण्यात आता एसीबीला बरेच यश येत आहे.
शासनाने सन २००९ पासून गोंदिया जिल्ह्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे स्वतंत्र कार्यालय दिले. मात्र नागरिकांच्या मनातील भिती आड येत असल्याने मागील साडेचार वर्षांत पाहिजे त्या प्रमाणात कारवाया करता आल्या नाही. मात्र तक्रार केल्यानंतर विभाग तक्रारदाराच्या पाठीशी राहून त्यांचे अडलेले काम सुद्धा करवून देण्याची हमी दिली जात असल्याने आता नागरिकांच्या मनातली भिती निघत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सन २०१४ च्या सहा महिने १५ दिवसांच्या काळात या विभागाने नऊ कारवाया केल्या. सन २००९ पासून अद्यापपर्यंत करण्यात आलेल्या २५ कारवायांत विभागाने लाचखोरीत अडकलेल्यांची दोन कोटी ३१ लाख ७८ हजार ८९९ रूपयांची अपसंपदा उघडकीस आणली आहे.
यामध्ये सन २०१० मध्ये करण्यात आलेल्या कारवाईत २४ लाख चार हजार ६८२ रूपयांची तर सन २०१२ मध्ये ८४ लाख ३१ हजार ५७० रूपयांची अपसंपदा उघडकीस आणली. जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई अभियंता दीपक पऱ्हाटे यांच्यावरील आहे. विभागाने त्यांच्याकडील एक कोटी २३ लाख ४२ हजार ६४७ रूपयांची अपसंपदा उघडकीस आणली. अशा प्रकारे एकूण दोन कोटी ३१ लाख ७८ हजार ८९९ रूपयांची अपसंपदा विभागाने उघडकीस आणली आहे.

Web Title: Rs 2.32 crore apocalypse exposed by ACB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.