गाळ््यांच्या फेरलिलावाला घेऊन पुन्हा घमासान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 06:00 IST2020-02-28T06:00:00+5:302020-02-28T06:00:10+5:30

शहरात नगर परिषदेच्या मालकीचे १०७८ गाळे असून या गाळ््यांचा लिलाव होऊन नऊ वर्षांपेक्षा जास्तीचा कालावधी लोटला आहे. महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व आद्योगीक नागरी अधिनियम १९६५ कलम ९२ (अ) अन्वये नगर परिषद आपली मालमत्ता ३ वर्षांकरिता भाड्याने देऊ शकते.

Round of re-tendering of flats | गाळ््यांच्या फेरलिलावाला घेऊन पुन्हा घमासान

गाळ््यांच्या फेरलिलावाला घेऊन पुन्हा घमासान

ठळक मुद्देकाही नगरसेवकांचा आक्षेप : नगर परिषदेकडून नोटीस वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नगर परिषदेच्या मालकीच्या १०७८ गाळ््यांच्या (दुकान) फेरलिलावाला घेऊन पुन्हा एकदा घमासान सुरू झाली आहे. नगर परिषदेने गाळेधारकांना गाळे रिकामे करण्यासाठी नोटीस बजावणे सुरू केले आहे. यावर मात्र काही नगरसेवकांनी नगर परिषद अर्थसंकल्पाच्या सभेत गोंधळ घालत यावर आक्षेप घेतला आहे. यामुळे नगर परिषदेत पुन्हा एकदा गाळ््यांचा चर्चेत आला आहे.
शहरात नगर परिषदेच्या मालकीचे १०७८ गाळे असून या गाळ््यांचा लिलाव होऊन नऊ वर्षांपेक्षा जास्तीचा कालावधी लोटला आहे. महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व आद्योगीक नागरी अधिनियम १९६५ कलम ९२ (अ) अन्वये नगर परिषद आपली मालमत्ता ३ वर्षांकरिता भाड्याने देऊ शकते. त्यानंतर भाडे पट्याचे नुतनीकरण करून ६ वर्षांपर्यत म्हणजे एकूण ९ वर्षांपर्यंत आपले गाळे भाड्याने देऊ शकते अशी तरतूद आहे. त्यानुसार, आता या गाळ््यांचा फेरलिलाव करता येणार आहे.
नगर परिषदेच्या २४ डिसेंबर २०१९ रोजीच्या सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक १६ अंतर्गत हा विषय मांडण्यात आला होता. त्यातही सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी हा नगर परिषद कामकाजाचा भाग असल्याने त्यांना ते करावे लागणार असे स्पष्ट केले होते. त्यानंतर, आता नगर परिषदेने गाळ््यांचा फेरलिलाव करता यावा यासाठी गाळेधारकांना गाळे रिकामे करून ताबा परत द्यावा असे नोटीस बजावण्यास सुरूवात केली आहे.यावर नगर परिषदेच्या अर्थसंकल्प सभेत काही नगरसेवकांनी याचा विरोध दशर्विला. परिणामी, सध्या गाळे फेरलिलावाचा विषय सध्या नगर परिषदेत चांगलाच चर्चेत आहे.

सुमारे ३५० नोटीस वितरीत
नगर परिषद बाजार विभागाकडून गाळेधारकांना ११ फेब्रुवारीपासून नोटीस दिले जात असून आतापर्यंत सुमारे ३५० नोटीस देण्यात आल्याची माहिती आहे. त्यात आता मधातच गाळे फेरलिलावाच्या विषयावर सभेत गोंधळ झाल्याने बाजार विभाग अडचणीत आला आहे. विशेष म्हणजे, नोटीस देण्यासाठी जात असलेल्या कर्मचाऱ्याला गाळेधारक धमकावत असल्याचेही खुद्द बाजार विभागातील अधिकारी-कर्मचारी सांगत आहेत. शिवाय, या प्रकरणात आता राजकारणही मधात टाकले जात असल्याचे दिसत आहे.
असे आहेत नगर परिषदेचे गाळे
नगर परिषद मालकीच्या गाळ््यांची ठराविक पाहणी केल्यास गंज बाजारात १५६, नवीन कपडा लाईन ६५, टाऊन स्कूल ३२, नाई लाईन २१, हायल मार्केट ८८, लोहा शेड २०, जाली शेड पहिला मजला २६, जाली शेड तळ माळा ३३, व्यापार संकुल जुने बस स्थानक २१, मनोहरभाई मार्केट फुटपाथ ६१, इंदिरा गांधी स्टेडियम ५९, रामनगर शॉपींग सेंटर ४२, कच्च्या दुकानी व ओटे ३५९ गाळे असून यासह शहरात अन्य ठिकाणांवर नगर परिषद मालकीचे गाळे असून अशाप्रकारे एकूण १०७८ गाळे आहेत.

Web Title: Round of re-tendering of flats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.