शॉपिंग कॉम्प्लेक्सचे छत कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 00:24 IST2017-08-17T00:23:45+5:302017-08-17T00:24:12+5:30
नगर परिषदेच्या पश्चीम भागात असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सचे बुधवार (दि.१६) रोजी अचानक कोसळल्याने त्या कॉम्पलेक्सच्या खाली जयदुर्गा प्लाय अँण्ड हार्डवेयर स्टोर्स च्या मालकाचे एक लाखाचे नुकसान झाले.

शॉपिंग कॉम्प्लेक्सचे छत कोसळले
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नगर परिषदेच्या पश्चीम भागात असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सचे बुधवार (दि.१६) रोजी अचानक कोसळल्याने त्या कॉम्पलेक्सच्या खाली जयदुर्गा प्लाय अँण्ड हार्डवेयर स्टोर्स च्या मालकाचे एक लाखाचे नुकसान झाले. या घटनेत चार व्यक्ती बाल-बाल बचावले.
अनेक वर्षापासून जूनी असलेल्या या इमारतीची जिर्णावसस्था झाली आहे. या शॉपींग कॉम्प्लेक्समध्ये अनेक दुकान आहेत. दुपारी अचानक पाऊस आला.
या दरम्यान शॉपींग कॉम्प्लेक्सच्या जयदुर्गा प्लाय अँण्ड हार्डवेयर स्टोर्स या दुकानाच्या वर असलेले छत कोसळले.छताच्या खाली टीनपत्रे, सनमााईका आल्याने ते तुटले. सोबतच दोन सायकल, एक मोटारसायकल व एक कार ची तुटफूट झाली. जयदुर्गा प्लाय अँण्ड हार्डवेयर स्टोर्स चे मालक हेमंत बटेजा आहेत. ते घटनेच्यावेळी उपस्थित नव्हते. दुकानात हितेश बटेजा, शेजारी कैलाश मुलचंदानी दोन नोकर महेश नागपुरे व शैलेश बंसोड उपस्थित होते. हे चारही बालबाल बचावले. हितेश बटेजा यांना विचारणा केल्यावर त्यांनी एक लाख रूपयाचे नुकसान झाल्याचे सांगितले. या घटनेत कैलाश मुलचंदानी यांच्या मोटारसायककलचे नुकसान झाले. नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती दिलीप गोपलानी यांनी घटनास्थळ गाठून निरीक्षण केले.