सडक अर्जुनीत कर्जमाफीचा जल्लोष
By Admin | Updated: June 26, 2017 00:20 IST2017-06-26T00:20:54+5:302017-06-26T00:20:54+5:30
राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे सडक अर्जुनी येथे

सडक अर्जुनीत कर्जमाफीचा जल्लोष
पालकमंत्र्यांनी भरविले पेढे : जनसंपर्क कार्यालयासमोर फटाके फोडून आनंद व्यक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक अर्जुनी : राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे सडक अर्जुनी येथे रविवारी भाजपच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी आतषबाजी केली.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला. ना.बडोले यांनी शेतकऱ्यांना पेढे भरविले. यावेळी प्रामुख्याने जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, भाजपचे सडक-अर्जुनी तालुकाध्यक्ष विजय बिसेन, माजी सभापती तथा अर्जुनी मोरगाव तालुकाध्यक्ष उमाकांत ढेंगे, पं.स. सदस्य राजेश कठाणे, विनोद नाकाडे, लक्ष्मीकांत धनगाये, विलास वट्टी, ता.महामंत्री परमानंद बडोले, तुकाजी राणे, राजू परशुरामकर, गुड्डू डोंगरवार, ललित शहारे उपस्थित होते.