शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
2
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
3
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
4
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
5
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
6
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
7
गळाभेट घेतली, नमस्कार केला, पंतप्रधान मोदी भर मंचावर कुणासमोर झाले नतमस्तक, ती ज्येष्ठ व्यक्ती कोण?
8
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
9
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
10
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
11
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
12
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
13
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
14
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
15
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
16
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
17
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
18
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
19
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
20
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या रस्त्यांची दुर्दशा

By admin | Updated: December 8, 2014 22:37 IST

तालुक्यातील प्रमुख सात-आठ गावाला जाणारे रस्ते मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त झाले आहेत. या मार्गांची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. कोणतेही वाहन चालविण्यासाठी चालकाला मोठी कसरत करावी लागते.

आमगाव : तालुक्यातील प्रमुख सात-आठ गावाला जाणारे रस्ते मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त झाले आहेत. या मार्गांची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. कोणतेही वाहन चालविण्यासाठी चालकाला मोठी कसरत करावी लागते. निधी नाहीच्या नावावर हात वर करून अधिकारी व नेते वेळकाढूपणाचे धोरण अवलंबवित असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे.
आमगाव हे तालुक्याचे ठिकाण आहे. येथे बाहेर गावावरून मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. वेळेवर जे मिळेल त्या साधनाने येऊन काम करून प्रत्येक जन निघून जातात. यात मोठी गैरसोय शाळकरी मुलांची होत आहे. मात्र प्रशासन व स्थानिक नेते मुकबधीर होऊन बसले आहेत. काही गावांना जाणारे मार्ग दहा ते वीस वर्षांपासून दुरूस्ती करणापासून वंचित आहेत. फक्त निधी नाही, नियोजनाअभावी कामे थांबली आहेत, अशी बतावणी करून वेळकाढूपणाचे धोरण सुरू आहे.
अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद गोंदिया येथे भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. मग सतत ५ ते १० वर्षांपासून तालुक्याला रस्ते दुरूस्तीसाठी निधी शासनाकडून का पाप्त झाला नाही? किंवा निधीसाठी पाठपुरावा कधीच का केला गेला नाही किंवा निधी आला तर तालुक्यातील रस्त्यावर अन्याय का झाला, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. नागरिकांना नगरात येताना जो त्रास होतो त्याचा पाठपुरावा अजूनपर्यंत झाला नाही. आमगाव, कुंभारटोली, बिर्सी, जामखारी, तिगाव, कोपीटोला पुढे मांडोबाई, आमगाव, किडंगीपार, शिवणी, चिरचाळबांध, सितेपार, भजेपार, कालीमाटी-सुपलीपार, मोहगाव कार्तुली, कालीमाटी ते मुंडीपार, भोसा, करंजी, आमगाव, शंभुटोला, महारीटोला, सरकारटोला, ननसरीपुढे मुंडीपार अशाप्रकारे जवळपास २५ ते ३० गावांना जाणाऱ्या जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे.
तालुक्यात जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे निवासस्थान आहे. जिल्हा परिषद सदस्य टुंडीलाल कटरे, योगेश्वरी पटले, उषा हर्षे, संगीता दोनोडे यांच्या जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणारे रस्ते मोठ्या प्रमाणात खड्ड्यांनी भरून गेले आहेत. फक्त जिल्हा परिषदेचे कोणते लाभ आपणाला किंवा आपल्या चेलेचपाट्यांना कसे मिळतील, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहेत. बंधारे, खळीकरण, सिमेंट रस्ते, नाली बांधकाम मिळविण्याकरिता अनेक जि.प. सदस्य व्यस्त असतात. त्यांना त्यांच्या क्षेत्राचे कामे मिळतात. मात्र त्यांच्या क्षेत्रातील रस्त्यांचे डांबरीकरण होण्याकरिता ठोस उपाय अजूनपर्यंत झाले नाही. फक्त नगरातील कामठा चौकात आमगाव, शंभुटोला, ननसरी मार्गांचे डांबरीकरण व्हावे, याकरिता सर्वदलीय उपोषण करण्यात आले. मात्र तेथेसुध्दा काम पूर्णत्वास अजूनपर्यंत गेले नाही.
एकंदरीत आज सत्ता संपूर्ण एका पक्षाची आहे. एक हाती सत्ता असल्यामुळे आता तरी तालुक्यातील ज्या प्रमुख गावांना जाणाऱ्या मार्गाची जी दुर्दशा झाली आहे, त्यांचे डांबरीकरण अत्यंत गरजेचे आहे. जवळच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येत असल्याने आचार संहितेचा फटका नाकारता येणार नाही. त्यामुळे लवकर डांबरीकरण करणे आवश्यक आहे. (तालुका प्रतिनिधी)