मजुरांकडून ग्रामीण भागात संसर्गाचा अधिक धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:00 IST2020-03-25T05:00:00+5:302020-03-25T05:00:31+5:30
रोजगार रोजगारानिमित्त मोठ्या शहरात गेलेले तरुण गावी आल्यानंतर स्वत:चे विलगीकरण करत नाही. तर मोहल्ल्यातील गल्लीतील मुलांसोबत गप्पागोष्टी करताना दिसतात. म्हणून बाहेरून आलेल्यांनी स्वत: १५ दिवस विलगीकरण करून घ्यावे. तर ग्रामीण भागातील संसर्गाचा धोका टाळता येईल.

मजुरांकडून ग्रामीण भागात संसर्गाचा अधिक धोका
लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : ग्रामीण भागातील काही युवक व काही माणसे रोजगारासाठी पुणे-मुंबई, नागपुर यासारख्या मोठया शहरांमध्ये रोजगारासाठी जातात. मात्र कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे ते आता गावाकडे परतत आहेत. मात्र त्यांची आरोग्य तपासणी केली जात नसल्याने त्यांच्यापासून संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस विभाग, महसूल विभागातील स्थानिक कर्मचारी यांनी या बाबींकडे लक्ष द्यावे. अशी मागणी काही स्थानिक नागरिकांनी केली आहे.
रोजगार रोजगारानिमित्त मोठ्या शहरात गेलेले तरुण गावी आल्यानंतर स्वत:चे विलगीकरण करत नाही. तर मोहल्ल्यातील गल्लीतील मुलांसोबत गप्पागोष्टी करताना दिसतात. म्हणून बाहेरून आलेल्यांनी स्वत: १५ दिवस विलगीकरण करून घ्यावे. तर ग्रामीण भागातील संसर्गाचा धोका टाळता येईल. एक सामाजिक दायित्व म्हणून या भयावह रोगापासून स्वत:चा, कुटुंबियांचा व समाजाचा विचार करून विलगीकरण प्रक्रि येला सामोरे जाण्याची गरज आहे. परंतु सध्या असे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत नाही.
चान्ना कोडका, नवेगावबांध व परिसरातील अनेक तरु ण रोजगारानिमित्त शहरात मोठ्या प्रमाणात जात असतात. अशा बाहेरून आलेल्यांनी स्वत:हूनच तलाठी, पोलीस स्टेशन, अंगणवाडी कार्यकर्त्यांना, आरोग्यसेविका, सेवक यांना द्यायला पाहिजे. जेणेकरून उद्या होणारा संक्र मण आजच रोखता येईल. पण असे फारसे होत नाही. बाहेरून आलेले पुढे यायला तयार नसतात. त्यांचे कुटुंबीय यात पुढाकार घ्यायला तयार नसतात. त्यामुळे संक्रमणाचा धोका अधिक असतो.
या बाबीकडे स्थानिक प्रशासनाने वेळीच लक्ष दिले तर पुढे होणारा धोका वेळीच टाळता येईल.या बाबीकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देऊन, संभाव्य कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कोरोना व्हायरसमुळे देशाची व राज्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. सामाजिक अंतर व गर्दी टाळणे या दोन गोष्टी जरी आपण एक जबाबदारी म्हणून पार पाडली तरच बाहेरच्या संसर्गापासून स्वत:चा कुटुंबियांचा व गावकऱ्यांचा बचाव करू शकतो. या बाबीकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.