दोन बलात्काऱ्यांना सश्रम कारावास
By Admin | Updated: February 7, 2015 01:01 IST2015-02-07T01:01:39+5:302015-02-07T01:01:39+5:30
गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नवरगाव-खुर्द व जगनटोला येथील प्रत्येकी एक अशा दोघांना जिल्हा सत्र न्यायालयाने कारावासाची शिक्षा ठोठावली.

दोन बलात्काऱ्यांना सश्रम कारावास
गोंदिया : गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नवरगाव-खुर्द व जगनटोला येथील प्रत्येकी एक अशा दोघांना जिल्हा सत्र न्यायालयाने कारावासाची शिक्षा ठोठावली.
गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चुलोद येथील आरोपी राजाराम गणू मोहनकर (६०) या नराधमाने नवरगाव खुर्द येथील ९ वर्षाच्या चिमुकलीवर २२ नोव्हेंबर २००९ रोजी दुपारी १२.३० वाजता बलात्कार केला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक कुंदोजवार यांनी केला यांनी तपास केला. या प्रकरणावर प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश एम.जी. गीरटकर यांनी शुक्रवारी सुनावणी केली. या प्रकरणातील आरोपी राजाराम मोहनकर याला २ वर्षाची शिक्षा व ३ हजार रूपये दंड ठोठावण्यात आला आहे. सरकारी वकील म्हणून अँड. सुजाता तिवारी यांनी काम पाहिले.
दुसऱ्या प्रकरणाचा निकाल बुधवारी लागला. प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश एम.जी. गीरटकर यांनी सुनावणी केली. गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जगनटोला येथील आनंदराव देऊ म्यशाम (५०) याने २ डिसेंबर २००७ रोजी दुपारी २ वाजता दरम्यान गावातीलच ८ वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग केला. या प्रकरणात गोंदिया ग्रामीण पोलिसांनी भादंविच्या कलम ३७६, ४४८ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक बई.जे. यादव यांनी केला होता.
या प्रकरणावर बुधवारी सुनावणी करण्यात आली. आरोपी आनंदराव मेश्राम याला १ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून अॅड.विणा बाजपेयी यांनी कामकाज पाहिले. सदर न्यायालयीन कामकाज पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना यांच्या मार्गदर्शनात सीएमएस सेलचे प्राभरी महाले यांच्या देखरेखीखाली सहाय्यक फौजदार रामदास शेंडे व इतर कर्मचाऱ्यांनी केले. आरोपीवर असलेल्या ३७६ कलमाच्या ठिकाणी ३५४ कलम लावून एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)