हरिणीला ट्रकने चिरडले

By Admin | Updated: June 16, 2015 00:50 IST2015-06-16T00:50:34+5:302015-06-16T00:50:34+5:30

रस्ता ओलांडणाऱ्या मादी हरिणीला एका तीव्र गतीने येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली.

The rick crashed into the truck | हरिणीला ट्रकने चिरडले

हरिणीला ट्रकने चिरडले

अपघात : गर्भातून पाडस बाहेर
देवरी : रस्ता ओलांडणाऱ्या मादी हरिणीला एका तीव्र गतीने येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली. या घटनेत मादी हरीणच नव्हे तर तिच्या पोटात (गर्भात) वाढणाऱ्या लहान पाडसाचाही मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि.१५) दुपारी १२ वाजताच्या सुमारास देवरीपासून चार किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर घडला.
एक मादी हरीण रस्ता ओलांडत असताना अचानक तीव्र गतीने आलेला ट्रक सदर हरिणीच्या पोटावरून गेला. ट्रकच्या खाली आल्यामुळे मादी हरिणीचे पोट फाटले व तिच्या गर्भाशयात वाढत असलेला एक लहान जीव रस्त्यावर फेकला गेला. या अपघातात जन्म घेण्याच्या पूर्वीच सदर लहान जीवाचा मृत्यू झाला. दुसरीकडे पोट फाटल्यामुळे मादी हरिणीचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच देवरी वनविभागाचे राऊंड आॅफिसर सचिन ताकसांडे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सदर हरिणीची उत्तरीय तपासणी करविली व अंत्यसंस्काराच्या प्रयत्नाला लागले. त्यांनी सांगितले की सदर हरीणीाची वय जवळपास तीन वर्षे होते व शक्यतो दोन-चार दिवसांतच ती प्रसूत होणार होती.

Web Title: The rick crashed into the truck