गोदामाच्या ताब्यापूर्वीच तांदळाचे नियतन आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:00 IST2020-02-09T05:00:00+5:302020-02-09T05:00:17+5:30

रस्त्यापासून घाटबांधे राईस मिलकडे रस्ता जातो. रस्त्याच्या दुतर्फा शेती आहे. आता या रस्त्याने जातांना दुचाकी फसते. तर तांदळाने भरलेल्या ट्रकची दशा काय होईल. ही बाब जिल्हा पुरवठा अधिकाºयांच्या निरीक्षणात निदर्शनास कशी आली नाही हे एक कोडेच आहे. या यादीत यापूर्वी काळ्या यादीत असलेल्या राईस मिलची नावे समाविष्ट असल्याचे बोलल्या जाते.

Rice allocation order before the warehouse is occupied | गोदामाच्या ताब्यापूर्वीच तांदळाचे नियतन आदेश

गोदामाच्या ताब्यापूर्वीच तांदळाचे नियतन आदेश

ठळक मुद्दे१५ दिवसांपासून करारनामे । ताबा घेण्यास दिरंगाई

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : पणन हंगाम २०१९-२० अंतर्गत भरडाई अंती प्राप्त होणाऱ्या सीएमआर तांदूळ साठवणुकीसाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी निरीक्षण करून २१ जानेवारीला करारनामा केला. मात्र १५ दिवसानंतरही गोदामात विद्युत व्यवस्था नाही. गोदामात धानाचे रिकामे पोते अस्ताव्यस्त पडून असल्याचे वास्तव उघडकीस आले आहे. राजकीय दबावाखाली पुरवठा विभागाने लगीनघाई करीत असल्याची माहिती आहे.
पुरवठा विभागाने गोदामांचा ताबा अद्यापही घेतला नाही. गोदाम निश्चित होऊन करारनामे झाले.गोदामपाल व गुणवत्ता नियंत्रकांची नियुक्ती झाली. तांदूळ देणाºया राईस मिल धारकांची यादी निघाली. मंत्रालयातून नियतन आदेश सुद्धा निघाले. मात्र अद्यापही साठवणूक करण्यासाठी गोदामच तयार नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. गोदामांचे निरीक्षण व करारनामा झाल्याचे गोंदियाचे जिल्हा पुरवठा निरीक्षक सांगत असले तरी गोदामांची आजची परिस्थिती लक्षात घेता या सर्व बाबी संशयास्पद असल्याचा आरोप केला जात आहे.
शुक्र वारी जिल्ह्यातील काही राईसमिल मालकांनी हा सर्व प्रकार स्थानिक अधिकाºयांच्या लक्षात आणून दिला. गोदामात त्यांनी भेट दिल्यानंतर यातील वास्तव पुढे आले. तालुक्यात सद्या पावसाचे वातावरण आहे. इटखेडा-अर्जुनी मोरगाव रस्त्यावर घाटबांधे राईसमिल आहे. या रस्त्यापासून घाटबांधे राईस मिलकडे रस्ता जातो. रस्त्याच्या दुतर्फा शेती आहे. आता या रस्त्याने जातांना दुचाकी फसते. तर तांदळाने भरलेल्या ट्रकची दशा काय होईल. ही बाब जिल्हा पुरवठा अधिकाºयांच्या निरीक्षणात निदर्शनास कशी आली नाही हे एक कोडेच आहे. या यादीत यापूर्वी काळ्या यादीत असलेल्या राईस मिलची नावे समाविष्ट असल्याचे बोलल्या जाते.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात निवड केलेल्या गोदामांचा ताबा पुरवठा विभागाने घेतला नसला तरी या गोदामात मात्र श्रीकृष्ण राईस मिल अर्जुनी मोरगाव, शारदा राईस मिल अर्जुनी मोरगाव व रामदेव अ‍ॅग्रो प्रॉडक्ट या राईस मिलचे लेबल लागलेला तांदूळ चितलंगे राईस मिलमध्ये साठवून ठेवलेला आढळला.
करारनामा झाल्यानंतर तांदूळ साठवून ठेवण्याची परवानगी दिली नसतांना गोदामात तांदूळ कसा साठवून ठेवला? हा तांदूळ जप्त करण्यात यावा, अशी मागणी राईसमिल मालकांनी महसूल विभागाच्या अधिकाºयांकडे केली, मात्र ही मागणी मान्य झाली नाही. १ फेब्रुवारीच्या आदेशात ज्या राईसमिल मालकांना घाटबांधे व चितलंगे गोदामात सीएमआर तांदूळ जमा करण्याचे आदेश देण्यात आले त्यातील तिन्ही गोदाम राईस मिल मालकांचेच आहेत हे विशेष.

अजून ताबा घेतला नाही- वानखेडे
घाटबांधे व चितलंगे या गोदामांचा करारनामा झाला आहे. गोदामपाल व गुणवत्ता नियंत्रकांची नियुक्ती करण्यात आली. तत्पूर्वी गोदामांचे निरीक्षण एक आठवड्यापूर्वी करण्यात आले.मी निरीक्षण केले तेव्हा गोदामांची साफसफाई सुरू होती. गोदामात असलेला तांदूळ राईस मिल मालकांचा असेल. अजून गोदामांचा ताबा घेतलेला नाही.असे जिल्हा पुरवठा अधिकारी डी.के.वानखेडे यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.

Web Title: Rice allocation order before the warehouse is occupied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.