बोंडगावदेवी येथे प्रभागस्तरीय समितीची आढावा बैढक
By Admin | Updated: September 1, 2014 23:43 IST2014-09-01T23:43:07+5:302014-09-01T23:43:07+5:30
बोंडगावदेवी जिल्हा परिषद प्रभाग समितीची आढावा बैठक जि.प. सदस्य अरविंद शिवणकर यांनी घेतली. बैढकीला शासकीय खाते प्रमुखांसह ग्रामपंचायतचे ग्रामसेवक तसेच सरपंचाची उपस्थिती होती.

बोंडगावदेवी येथे प्रभागस्तरीय समितीची आढावा बैढक
बोंडगावदेवी : बोंडगावदेवी जिल्हा परिषद प्रभाग समितीची आढावा बैठक जि.प. सदस्य अरविंद शिवणकर यांनी घेतली. बैढकीला शासकीय खाते प्रमुखांसह ग्रामपंचायतचे ग्रामसेवक तसेच सरपंचाची उपस्थिती होती.
बोंडगावदेवी पंचायत समिती गणामधील येरंडी/देवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रभाग समितीच्या आढावा बैढकीचे आयोजन करण्यात आले होते. जि.प. सदस्य शिवणकर यांनी यापुर्वी १३ प्रभाग समितीच्या आढावा बैढकी घेऊन बोंडगावदेवी जि.प. सर्कलच्या समस्या दुर सारण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार येरंडी/देवी येथील आढावा बैढक त्यांच्याच अध्यक्षतेत घेण्यात आली.
याप्रसंगी येरंडी विहिरगाव ग्रामपंचायतच्या सरपंच कमला कोरे, सिलेझरी ग्रा.पं. सरपंच धार्मिक गणविर, निमगाव ग्रा.पं. सरपंच देवाजी डोंगरे प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले.
प्रभाग समितीच्या आढावा बैठकीत विहिरगाव/येरंडी ची ग्रामसेवक जे.एस. नायलवाडे, बोंडगावदेवी ग्रामसेवक एल.एन. ब्राम्हणकर, निमगाव अरतोंडीचे ग्राम विस्तार अधिकारी आर.जी. गणविर, चन्ना बाक्टीचे टी.आर. वाघमारे, के.टी. तुरकर, अरविंद साखरे या ग्रामसेवकांनी ग्रामपंचायत स्तरावरील विकास कामांचा व घरटॅक्स वसुलीचा, नियोजित कामाचा आढावा सादर केला. बैठकीला जिल्हा परिषद तसेच राज्यशासनाचे खाते प्रमुख हजर होते. यात पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) आर.डी. वलथरे, लघु पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता पी.एस. वडीपार, कृषी सहायक बी.एन. येरणे, सहा. पशुधन विकास अधिकारी डॉ. व्ही.आय. बडोले, डॉ. वाय.यु. वाघाये, सिलेझरीचे केंद्रप्रमुख बी.डब्ल्यू. भानारकर, चान्ना प्रा.ओ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजीव डोबे, सह. कनिष्ठ अभियंता सी.एस. चौधरी, पं.स. बांधकाम विभागाचे क.अ. टीपी कचरे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी डी.बी. उईके या खाते प्रमुख अधिकाऱ्यांनी विभाग निहाय आढावा बैठकीत सादर केला.
याप्रसंगी शिवणकर यांनी प्रभाग समितीच्या वैधानिक बैठकीला दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवून त्यांचेवर कारवाई करण्याचे निर्देश समितीचे सचिव उईके यांना दिले. बैठकीच्या माध्यमातून क्षेत्राचा विकास साधणे सहज शक्य असते. जिल्हा नियोजन समितीमध्ये विकास कार्यासाठी भरपूर निधीची तरतुद केली आहे. परंतु संबंधित विभागाचे अधिकारी कार्यतत्परता दाखवित नसल्याने निधी परत जातो ही चिंतेची बाब असल्याच मत त्यांनी व्यक्त केले.
बोंडगावदेवी जि.प. सर्कल मध्ये विकास कामात अडकाठी न आणता संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यतत्परता दाखवून विकासाला हातभार लावावा. कामचुकार कर्मचाऱ्यांना वेळीच आवर घालणे गरजेचे असल्याचे ते बैठकीत म्हणाले.
प्रभाग समितीच्या आढावा बैठकीची कारवाई समितीचे सचिव पंचायत समिती कृषी अधिकारी उईके यांनी पार पाडली. (वार्ताहर)