सेवानिवृत्त पाटलाचा केला सत्कार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:39 IST2021-02-27T04:39:08+5:302021-02-27T04:39:08+5:30

संघटना अधिक बळकट कशी करता येईल व कोरोना सदृश्य परिस्थितीत शासनाला अधिक मदत कशी करता येईल जेणेकरून कोरोना महामारीच्या ...

Retired Patla felicitated () | सेवानिवृत्त पाटलाचा केला सत्कार ()

सेवानिवृत्त पाटलाचा केला सत्कार ()

संघटना अधिक बळकट कशी करता येईल व कोरोना सदृश्य परिस्थितीत शासनाला अधिक मदत कशी करता येईल जेणेकरून कोरोना महामारीच्या साखळीला आळा घालण्यास मदत होईल या विषयावर उपस्थित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. संघटनेचे सर्व सदस्य हे एक कुटुंब असून सर्वांना समान हक्क असल्याचे कार्याध्यक्ष प्रवीण कोचे यांनी सांगीतले. पोलीस पाटलांच्या समस्या व संघटना सुरळीतपणे चालविण्यासाठी पैशाचे पाठबळ असणे आवश्यक आहे तरी सर्वानी लवकरात लवकर सदस्य नोंदणी करून सदस्य व्हावे असे करावे पोलीस पाटील संजय हत्तीमारे यांनी सांगितले. प्रदीप बावनथडे, मनोहरसिंह चव्हाण, सुरेश कोरे, ताजने, भगत, ईंदूमती रहांगडाले यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी दिवंगत पोलीस पाटलांना दोन मिनिटे मौन पाळून श्रध्दांजली वाहण्यात करण्यात आली.

प्रास्ताविक व संचालन श्री लक्ष्मीकांत कोल्हे यांनी केले.

Web Title: Retired Patla felicitated ()