शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
2
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
3
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
4
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
5
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
6
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
7
गळाभेट घेतली, नमस्कार केला, पंतप्रधान मोदी भर मंचावर कुणासमोर झाले नतमस्तक, ती ज्येष्ठ व्यक्ती कोण?
8
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
9
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
10
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
11
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
12
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
13
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
14
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
15
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
16
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
17
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
18
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
19
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
20
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

रापेवाडातील जागेवर जलाशयाची आडकाठी

By admin | Updated: December 9, 2014 22:52 IST

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी नगर परिषदेसह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना पसंत आलेल्या रापेवाडातील जागेत मात्र जलाशयाची आडकाठी येत आहे. या जागेवर जलाशय प्रस्तावित असल्याने

कपिल केकत - गोंदिया
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी नगर परिषदेसह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना पसंत आलेल्या रापेवाडातील जागेत मात्र जलाशयाची आडकाठी येत आहे. या जागेवर जलाशय प्रस्तावित असल्याने पालिकेचे पुन्हा एकदा टेंशन वाढले आहे. मात्र प्रकल्पासाठी जागा अत्यंत उपयुक्त असल्याने पालिकेने या जागेच्या सविस्तर अहवालासाठएी लघुपाटबंधारे उपविभागीय अभियंत्यांकडे मागणी केली आहे. त्यामुळे सध्यातरी नगर परिषद प्रशासनाची या जागेवरून धाकधुक सुरू आहे.
शहरात निघणाऱ्या घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी नगर परिषदेकडे व्यवस्थापन प्रकल्प असणे गरजेचे आहे. यावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत एक समिती कार्यरत असून विद्यमान जिल्हाधिकारी या प्रकल्पासाठी गंभीर दिसून येत आहे. कटंगी येथील जागेला विमान प्राधीकरण नियमानुसार परवानगी देता येणार नाही असे विमान प्राधीकरणच्या अधिकाऱ्यांनी समितीच्या बैठकीत स्पष्ट केले होते. शिवाय अन्य काही कारणांमुळे ही जागा प्रकल्पासाठी उपयुक्त नसल्याचे निर्दशनास आले होते.
समितीतील या चर्चेनंतर जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुमंत मोरे यांना प्रकल्पासाठी अन्य जागा शोधण्याचे निर्देश दिले. त्यानुसार नगर परिषदेने जवळील ग्राम रापेवाडा येथील गट क्रमांक ६४३ मधील झुडूपी जंगलाची आराजी ३५.१९ हेक्टर जागा बघितली होती. त्या जागेतील सुमारे ४ हेक्टर जागा प्रकल्पाला मिळावी यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू असून यासंबंधात कार्यवाही सुरू होती.
अशातच नगर परिषद अध्यक्ष कशिश जायस्वाल, उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव, तहसीलदार संजय पवार, नगर परिषद मुख्याधिकारी सुमंत मोरे व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी भड यांनी २ डिसेंबर रोजी रापेवाडा येथे बघून ठेवलेल्या जागेची पाहणी केली. प्रकल्पाच्या दृष्टीने ही जागा सर्वांनाच आवडल्याने ३ डिसेंबर रोजी नगर रचना सहायक संचालक श्रीमती थूल यांनीही तहसीलदार संजय पवार, नगर परिषद मुख्याधिकारी सुमंत मोरे, नगर रचना विभागातील सलाम कुरेशी व अन्य अधिकाऱ्यांसह जागेची पाहणी केली. एवढेच नव्हे तर नगर परिषदेला आवश्यक एवढ्या जागेची मोजणी सुद्धा करविली. मात्र या दरम्यान सदर जागेवर एक जलाशय प्रस्तावित असल्याची माहिती पालिकेच्या हाती लागली. त्यामुळे ही जागा हातून गेल्यास पुन्हा दुसऱ्या जागेसाठी धावपळ करावी लागणार असल्याचे पालिका प्रशासनाचे टेंशन वाढले आहे.
ही जागा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असल्याने सर्वांचे लक्ष या जागेकडे लागले आहे. प्रस्तावित जलाशयापासून ५०० मीटर अंतरावर पालिकेला प्रकल्पासाठी जागा हवी आहे. अशात या जागेबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पालिकेने लघुपाटबंधारे विभागाकडे अर्ज करून जागेचा सविस्तर अहवाल मागितला आहे.