अन्याय अत्याचाराची माहिती पोलिसांना निर्भयपणे द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 05:00 IST2020-01-09T05:00:00+5:302020-01-09T05:00:32+5:30
या सप्ताहांतर्गत ३ जानेवारीला शालेय विद्यार्थिनीना मार्गदर्शन कार्यक्रम भागीरथाबाई आत्माराम डोंगरवार विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय व उमाबाई संग्रामे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय घेण्यात आला. मुला, मुलींच्या स्वसंरक्षणार्थ कराटे प्रात्यिक्षक पोलीस नायक कुसराम व त्यांच्या चमूने विद्यार्थ्यांसमोर दिले. प्रत्येकाला जगण्याचा, विकासाचा, सहभागाचा व संरक्षणाचा अधिकार आहे.

अन्याय अत्याचाराची माहिती पोलिसांना निर्भयपणे द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार नवेगावबांध पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २ ते ८ जानेवारी दरम्यान पोलीस स्थापना दिवस सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
या सप्ताहांतर्गत ३ जानेवारीला शालेय विद्यार्थिनीना मार्गदर्शन कार्यक्रम भागीरथाबाई आत्माराम डोंगरवार विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय व उमाबाई संग्रामे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय घेण्यात आला. मुला, मुलींच्या स्वसंरक्षणार्थ कराटे प्रात्यिक्षक पोलीस नायक कुसराम व त्यांच्या चमूने विद्यार्थ्यांसमोर दिले. प्रत्येकाला जगण्याचा, विकासाचा, सहभागाचा व संरक्षणाचा अधिकार आहे. बालकांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराची माहिती न लपविता निर्भयपणे पोलिसांना द्यावी. बालकांचे हक्क व सुरक्षितता यावर कार्यक्र मात मार्गदर्शन केले. बाल न्याय कायदा २०१५, बालमजूर कायदा २०१६, बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६, लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण कायदा २०१२ याची माहिती दिली. पोलीस कायद्याची अंमलबजावणी कशी करतात. याबाबतचे कायदे आहेत. यावरही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. मुला, मुलींवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराची माहिती न घाबरता पोलिसांना व बाल कल्याण समिती गोंदिया यांच्या हेल्पलाइन क्रमांक १०९८ यावर निर्भयपणे द्यावी. यासाठी आईवडील आणि शिक्षकांना द्यावी असे सांगितले.
पोलीस नायक मेश्राम यांनी वाहतुकीच्या नियमांची माहिती दिली. पोलीस निरीक्षक दिनकर ठोसरे, ेप्राचार्य डी.एम.संग्रामे, बोरकर, शिवरकर, कापगते, लांजेवार, नाकाडे, चांदेवार, आदमने व ४५० विद्यार्थी उपस्थित होते.