शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

सहा तालुक्यांत पुन्हा अतिवृष्टी

By admin | Updated: August 5, 2014 23:30 IST

मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जिल्हा पुन्हा एकदा जलमय झाला आहे. तिरोडा व अर्जुनी मोरगाव तालुका वगळता अन्य सहा तालुक्यांत मंगळवारी सकाळपर्यंतच्या

रजेगाव पूल बंद : हवामान खात्याने दिले जोरदार पावसाचे संकेतगोंदिया : मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जिल्हा पुन्हा एकदा जलमय झाला आहे. तिरोडा व अर्जुनी मोरगाव तालुका वगळता अन्य सहा तालुक्यांत मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे रस्ते वाहतूक बंद पडत असतानाच घरांच्या पडझडींचीही माहिती येत आहे. त्यातच बाघ नदी फुगल्याने रजेगाव पुलावरून होणारी वाहतूक बंद पडली असून मध्यप्रदेशसोबतचा संपर्क तुटला आहे. विशेष म्हणजे हवामान खात्याने ७ आॅगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. सडक अर्जुनी , आमगाव व देवरी तालुक्याला पावसाने सर्वाधीक झोपडल्याचे दिसून येत आहे. परिणामी या तालुक्यांतील रस्ते वाहतुकीवर प्रभाव दिसून येत आहे. संततधार पावसामुळे धरणांचे गेट उघडून त्यातून पाणी सोडले जात आहे. यामुळे नदी- नाले फुगले असून त्यांना पुर आला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील सिरपूर धरणाचे ७ गेट ०.९० मीटरने, पुजारीटोला धरणाचे ८ गेट २.१० मीटरने तर कालीसराड धरणाचे २ गेट ०.५० मीटरने उघडण्यात आले आहे. मागील तीन दिवसांपासून बरसत असलेल्या या संततधार पावसामुळे बाघनदीची पातळी वाढली असून यामुळे रजेगाव पुलावरून पुन्हा पाणी वाहू लागले आहे. या पुलावरून ३० मिमीपर्यंत पाणी वाहात जात असल्याने वाहतूक बंद पडली असून मध्यप्रदेश राज्यासोबतचा संपर्क तुटला आहे. १५ दिवसांपूर्वी असाच संपर्क तुटला होता.(शहर प्रतिनिधी)