लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मुस्लीम समाजाबांधवासह इतर समाजाबांधवानी नागरिकता संशोधन कायद्याच्या विरोधात शनिवारी (दि.२१) उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. शहरातील मुख्य मार्गावरुन हा मोर्चा जयस्तंभ चौकातील उपविभागीय कार्यालयावर पोहचला. येथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. मान्यवरांनी मोर्चाला संबोधित केल्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.केंद्र सरकारच्या विरोधात काढण्यात आलेला मोर्च्यात अनेक समाजातील संघटनांनी एकत्र येऊन आपण एकत्र आणि भारतीय संविधानाला माणणारे आहोत असा संदेश दिला. उपविभागीय कार्यालयासमोरील रस्त्यावर पेंडाल टाकून विविध समाजाच्या पुढाऱ्यांनी भाषणे दिली. केंद्र सरकारच्या भुमिकेवर जोरदार टिका केली. या मोर्च्याला संविधान बचाव असे नाव देण्यात आले आहे. संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही मोर्च्याचे आयोजन केले आहे. आमचा नागरिकता संशोधन कायद्याला तिव्र विरोध आहे. हा कायदा देश तोडणारा कायदा आहे. सरकार असले कायदे आणून संविधानाचे अस्तीत्व संपविण्याचा प्रयत्न करीत आहे. भारतीय संविधानाने सर्वांना समानतेचा अधिकार दिला. संविधानाची मोडतोड करून देशात भेदाभेद निर्माण करू नये, मात्र सरकारने नागरिकता संशोधन कायदा पारीत करून सरकार देशातील बंधुत्व भाव संपवित आहे. या कायद्याच्या विरोधात संपूर्ण देश आहे. त्यामुळे या कायद्याला रद्द करण्याची मागणी मोर्चेकºयांनी केली. सदर मोर्चा संविधान मैत्री संघ,अवामे मुस्लीम गोंदिया जिल्हा, ओबीसी, व्हीजे एनटी, एससी, एसटी, मुस्लीम अल्पसंख्याकांनी महाविरोध मोर्चा काढला.उपविभागीय कार्यालयासमोरील डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आंबेकडर चौकातून मोर्चा जयस्तंभ चौक, होत नेहरू चौक, गोरेलाल चौक, पोलीस ठाणे मार्ग होत गांधी प्रतिमा चौक होत जयस्तंभ चौकात नेण्यात आला.नागरिकता संशोधन कायद्याला रद्द करण्यात यावे या मागणीचे निवेदन राष्टÑपती रामनाथ कोविंद यांच्या नावे उपविभागीय अधिकाºयांना देण्यात आले.मोर्च्यात संयोजक अतुल सतदेवे, सतीश बन्सोड, बबलू कटरे, रवी भांडारकर, सुनील भोंगाडे, सुनील पटले, सविता बेदरकर, पोर्णिमा नागदेवे, सुनील भालेराव, विनोद नांदूरकर, गुड्डू हुसेनी, जाकीर अली, सईम कुरेशी, मोहसीन खान, अहमद जावेद दरजा, अफजल शाह, अतीशार रहमान, मोसमी खान, मुजीब खान, फरान गोदुली, अकरम खा पठाण, मो.अनिष खान, जावेद रकाउद्दीन, परवेज शेख, शकील मन्सूरी, ईर्शाद शेख, मो.अतीन कुरेशी, मो. खालीद पठाण, आसीफ सैय्यद, अहमद मनिहार, मो.जलील खान, रिवान खान, एव्हरेस्ट डहाट, अमर खान, युनुस खान, आसीफ पेन्टर, मेहहाब खान, नईम, जमील खान, प्रशांत डोंगरे व इतर सहभागी झाले होते.पोलिसांचा चोख बंदोबस्तमोर्चा दरम्यान हिंसक घटना होऊ नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.गोंदिया शहर, रामनगर व गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी चोख बंदोबस्त करीत होते. शिवाय गोंदियाच्या पोलीस मुख्यालयातून पोलीस कर्मचाºयांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. काही कर्मचारी मोर्चेकºयांचे व्हिडीओ चित्रीकरण करीत होते. अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी पोलीस घेत होते.
देश तोडणारा कायदा रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 06:00 IST
केंद्र सरकारच्या विरोधात काढण्यात आलेला मोर्च्यात अनेक समाजातील संघटनांनी एकत्र येऊन आपण एकत्र आणि भारतीय संविधानाला माणणारे आहोत असा संदेश दिला. उपविभागीय कार्यालयासमोरील रस्त्यावर पेंडाल टाकून विविध समाजाच्या पुढाऱ्यांनी भाषणे दिली. केंद्र सरकारच्या भुमिकेवर जोरदार टिका केली.
देश तोडणारा कायदा रद्द करा
ठळक मुद्देउपविभागीय कार्यालयावर मोर्चा । नागरिकता संशोधन कायदा रद्द करण्याची मागणी । हजारो नागरिकांचा मोर्च्यात सहभाग