आमगावात अतिक्रमण हटाव
By Admin | Updated: January 8, 2015 22:57 IST2015-01-08T22:57:41+5:302015-01-08T22:57:41+5:30
आमगाव शहरातील रहदारीकरीता अडथळा होत असल्याने अतिक्रमणाला कंटाळून ग्राम पंचायत व बांधकाम विभागाने अतिक्रमण हटाव कारवाई सुरू केली आहे. परंतु कारवाई करताना मोठे

आमगावात अतिक्रमण हटाव
आमगाव : आमगाव शहरातील रहदारीकरीता अडथळा होत असल्याने अतिक्रमणाला कंटाळून ग्राम पंचायत व बांधकाम विभागाने अतिक्रमण हटाव कारवाई सुरू केली आहे. परंतु कारवाई करताना मोठे व्यवसाइकांना अतिक्रमण कारवाईतून वगळून छोट्या दुकान चालकांच्या दुकानांविरूद्ध बुलडोजर चालविण्यात आला. त्यामुळे नागरिक व व्यवसायिकांमध्ये तीव्र असंतोष उफाळून आला आहे.
आमगाव शहरातील मुख्य रस्त्यांवर वाठलेले अतिक्रमामुळे सामान्य नागरिकांना फायदल चालवणे कठीण झाले आहे. अनेक व्यवसाइकांनी आपल्या दुकानांसमोर अधिक अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले. या अतिक्रमणाकडे ग्राम पंचायत व बांधकाम विभागाने वेळीच दखल घेतली नाही त्यामुळे अतिक्रमण हटाव होण्याकरिता प्रोत्साहन मिळाले. यामुळे मुख्य मार्गावरील वाहतुक व्यवस्था तर पादचारी रस्ते अपघातांना आमंत्रण देणारे ठरले. अनेक व्यवसायिकांनी स्वत:च्या प्रतिष्ठानांसमोरील रस्त्यालागत असलेल्या सांडपाणी जाणाऱ्या नालींवर पक्के बांधकाम करून अतिक्रमण केले. त्यामुळे नागरिकांचे सांडपाणी जाणारी नाली पूर्णत: बंद झाल्याने सांडपाणी रस्त्त्यांवर आले. तर या परिस्थितील पावसाळ्यात अधिक आह्वान पेलण्यासाठी नागरिकांना समोर यावे लागले. याची दखल आता उशिरा ग्राम पंचायत तसेच बांधकाम विभागाने घेतली आहे.
शहरातील अतिक्रमण कारवाईला आज दि.८ जानेवारीला प्रारंभ करण्यात आली. परंतु अतिक्रमण कारवाईत मोठे व्यवसाइकांना डावलुन फुटकर विक्रेत्यांच्या दुकानांवर बुलडोजर चालविण्यात आले. त्यामुळे लहान फुटकर विक्रेत्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाले.
सदर अतिक्रमण जिल्हा परिषदच्या वर्तुळातून दबावतंत्राच्या माध्यमाने काढण्यात येत असल्याची अतिक्रमणकर्त्यांना सांगण्यात आले. अतिक्रमण काढताना पोलीसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता (शहर प्रतिनिधी)