हॉटेल्स, लॉज व विश्रामगृहांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 05:00 IST2020-07-11T05:00:00+5:302020-07-11T05:00:33+5:30
कोरोनामुळे देशात लॉकडाऊन झाल्यापासूनच हॉटेल्स, लॉज व विश्रामगृह बंद पडले होते. आता सुमारे ४ महिन्यांचा कालावधी लोटत असून त्यांचा व्यवसाय बंद पडल्याने हे सर्व व्यवसायी अडचणीत आले होते. राज्यात अनलॉकींगची प्र्रक्रीया सुरू असतानाच सर्व व्यवसायांना परवानगी देण्यात आली होती. मात्र फक्त हॉटेल्स व लॉज बंद होते. अशात त्यांनीही लवकरात लवकर त्यांचा हा व्यवसाय सुरू करण्याची मागणी केली होती.

हॉटेल्स, लॉज व विश्रामगृहांना दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव बघता लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील हॉटेल्स, लॉज, विश्रामगृह तसेच निवासाची व्यवस्था पुरविणाऱ्यांचा व्यवसाय बंद होता. आता मात्र त्यांना राज्य शासनाने दिलासा दिला असून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश काढले असून यासाठी मात्र ठरवून देण्यात आलेल्या अटी व शर्तींचे पालन करणे संबंधितांना बंधनकारक करण्यात आले आहे.
कोरोनामुळे देशात लॉकडाऊन झाल्यापासूनच हॉटेल्स, लॉज व विश्रामगृह बंद पडले होते. आता सुमारे ४ महिन्यांचा कालावधी लोटत असून त्यांचा व्यवसाय बंद पडल्याने हे सर्व व्यवसायी अडचणीत आले होते. राज्यात अनलॉकींगची प्र्रक्रीया सुरू असतानाच सर्व व्यवसायांना परवानगी देण्यात आली होती. मात्र फक्त हॉटेल्स व लॉज बंद होते. अशात त्यांनीही लवकरात लवकर त्यांचा हा व्यवसाय सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, आता राज्यातील हॉटेल्स, लॉज, विश्रामगृह व निवासाची व्यवस्था पुरविणाऱ्या व इतर आस्थापनांनाही परवानगी देण्यात आली आहे. यासाठी मात्र त्यांना त्यांच्याकडील ३३ टक्के कर्मचारी क्षमतेसह ठरवून दिलेल्या अटी-शर्तींचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.
विशेष म्हणजे, ही परवानगी कंटेन्मेंट झोनबाहेरील आस्थापनांसाठी आहे. शिवाय, ज्या आस्थापनांचा वापर अलगीकरण केंद्रासाठी केला जात असेल तो तसाच सुरू राहणार आहे. तसेच या आस्थापनांची न वापरलेली क्षमता अलगीकरण केंद्रासाठी घेण्याचा अधिकार जिल्हा प्रशासनास राहणार आहे.
या आहेत अटी-शर्ती
संबंधितांना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पोस्टर,बॅनर्स व चलचित्र दर्शनी भागावर लावणे, हॉटेल तसेच बाहेर परिसरात गर्दीबाबत योग्य व्यवस्थापन करणे, प्रवेशाच्या ठिकाणी हँडवॉश-सॅनिटायझर व थर्मल स्क्रिनींगची व्यवस्था तसेच रिसेप्शनवर संरक्षणात्मक काचेचा वापर करणे, कर्मचारी व पाहुण्यांसाठी मास्क, हातमोजे उपलब्ध करणे, जास्तीतजास्त कॉन्टॅक्टलेस प्रक्रीयेचा अवलंब करणे, फक्त निरोगी व मास्क च वापर करणाºयांच प्रवेशाची परवानगी देणे यासह अन्य अटी-शर्तींचे पालन बंधनकारक राहणार आहे.