कोरोनाचे निर्बंध शिथिल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:29 IST2021-07-29T04:29:45+5:302021-07-29T04:29:45+5:30

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झालेले आहे. परंतु सततच्या लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांवर वेळेचे निर्बंध लावून दुपारी ...

Relax the corona restrictions | कोरोनाचे निर्बंध शिथिल करा

कोरोनाचे निर्बंध शिथिल करा

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झालेले आहे. परंतु सततच्या लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांवर वेळेचे निर्बंध लावून दुपारी चार वाजता दुकाने बंद करण्यास सांगितले जात आहे. यामुळे छोटे व्यावसायिक आणि दुकानदारांची स्थिती हलाखीची झालेली आहे. व्यापाऱ्यांच्या अर्थकारणावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हॉटेल व्यवसाय तर सायंकाळी सुरू होताे. बरेच ग्राहक चारनंतरच खरेदीला बाजारात जातात. त्यामुळे चार वाजताच दुकाने बंद करण्याचे आदेश असल्याने व्यापारी वर्गामध्ये नाराजीचे वातावरण असून, नोकरदारांना वेतन देणेसुध्दा व्यावसायिकांना कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे छोटे व्यावसायिक आणि दुकानदारांची हलाखीची झालेली स्थिती सुधारण्याकरिता त्यांना दिलासा देण्याकरिता दुकाने चार वाजता बंद करण्याची अट तातडीने शिथिल करण्यात यावी, अशी मागणी माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. परिणय फुके यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Web Title: Relax the corona restrictions