आमगाव व तिरोडा रूग्णालयांचा कायाकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 20:53 IST2017-08-27T20:51:42+5:302017-08-27T20:53:41+5:30

रूग्णालयांचा कायाकल्प करण्यासाठी महाराष्टÑ शासनाच्या आरोग्य सेवा संचालनालयाकडून ‘कायाकल्प’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

Rejuvenation of Amgaon and Tiroda hospitals | आमगाव व तिरोडा रूग्णालयांचा कायाकल्प

आमगाव व तिरोडा रूग्णालयांचा कायाकल्प

ठळक मुद्देशनिवारी चमूने केली पाहणी : आरोग्य सेवा व भौतिक सुविधांचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रूग्णालयांचा कायाकल्प करण्यासाठी महाराष्टÑ शासनाच्या आरोग्य सेवा संचालनालयाकडून ‘कायाकल्प’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत आरोग्य संस्थांची पीर असेसमेंट करण्यासाठी जिल्ह्यातील तिरोडा येथील उपजिल्हा रूग्णालय व आमगाव येथील ग्रामीण रूग्णालयाची निवड करण्यात आली. या दोन्ही रूग्णालयांची पाहणी गडचिरोली येथील चमूने शनिवारी केली.
रूग्णालयातील बाह्यरूग्ण सेवा, आंतररूग्ण सेवा, प्रसूती, एक्सरे, तांबीचे प्रमाण, औषध पुरवठा, आकस्मीक आरोग्य सेवा, संदर्भ सेवा अशा विविध सेवा कशा पद्धतीने दिल्या जातात. तसेच आरोग्य सेवा पुरविण्यासाठी उपलब्ध असलेली साधने, रूग्णालयाचे स्वरूप, रूग्णालयात करण्यात आलेल्या भौतिक सुविधा या सर्व बाबींची तपासणी करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याची चमू जिल्ह्यात आली होती. तिरोडा येथे एक तर दुसरी चमू आमगाव येथे पाहणी करण्यासाठी आली होती.
शासनाच्या दिलेल्या निकषानुसार हे दोन रूग्णालय किती टक्के खरे उतरले याची पाहणी यावेळी करण्यात आली. सदर चमूने रूग्णालय परिसरात असलेल्या सर्वबाबींची काटेकोरपणे पाहणी केली. आमगाव येथे दाखल झालेल्या चमूत डॉ. चौधरी, डॉ. पंकज पटले, प्रविण यांचा समावेश होता. यावेळी आमगाव रूग्णालयाच्या अधिक्षीका डॉ. शोभना सिंह यांनी त्यांच्या येण्यापूर्वी रूग्णालयात किती रूग्णांना उपचार दिला गेला होता. झालेल्या प्रसूती व इतर सेवा तर त्यांनी या दिड वर्षात आमगाव ग्रामीण रूग्णालयाच्या बदलेल्या रूपाची माहिती दिली. यावेळी आमगाव तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व परिचर उपस्थित होते.

Web Title: Rejuvenation of Amgaon and Tiroda hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.