शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिस्ट आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
4
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
7
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
8
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
9
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
10
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
11
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
12
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
13
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
14
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
15
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
16
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
17
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
18
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
19
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
20
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या संकटातही पोलीस होण्यासाठी नियमित तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:01 IST

कोरोना महासंकटाने सर्वच जण हवालदिल झाले आहेत. अनेकांचे रोजगार गेले आहेत. तर काहींच्या हातांना काम नाही. अशा परिस्थितीत हातावर हात देऊन न बसता लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील सुमारे ४० ते ५० तरुण दररोज पोलीस बनण्याच्या महत्वकांक्षेने ध्येयवेडे होत सराव करीत आहेत. तरुणांच्या हौसेचे बळ बघता पोलीस सुद्धा त्यांना विविध टिप्स देऊन मार्गदर्शन करीत आहेत.

ठळक मुद्देसकाळ-सायंकाळ सराव: पालांदुरच्या पोलीस मैदानावर ध्येयवेड्यांची धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : इच्छा तिथे मार्ग म्हणतात, ते खोटे नाही. उचित ध्येय गाठण्यासाठी परिश्रमाशिवाय पर्याय नाही. एकदा अपेक्षित ध्येय निश्चित केले की, मग त्यासाठी सुरु होते धडपड. असेच काही तरुण पोलीस होण्यासाठी कोरोनाच्या महासंकटातही नियमित तयारी करीत आहेत. पालांदुरच्या पोलीस मैदानावर दररोज ४० ते ५० तरुण शारीरिक कवायती करताना दिसत आहेत. त्यांना पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी मार्गदर्शन करीत आहेत.कोरोना महासंकटाने सर्वच जण हवालदिल झाले आहेत. अनेकांचे रोजगार गेले आहेत. तर काहींच्या हातांना काम नाही. अशा परिस्थितीत हातावर हात देऊन न बसता लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील सुमारे ४० ते ५० तरुण दररोज पोलीस बनण्याच्या महत्वकांक्षेने ध्येयवेडे होत सराव करीत आहेत. तरुणांच्या हौसेचे बळ बघता पोलीस सुद्धा त्यांना विविध टिप्स देऊन मार्गदर्शन करीत आहेत.पालांदूर परिसरात मोठे मैदान नसल्याने पोलीस ठाण्याच्या आवारातच ही तरुणाई विविध शारीरिक कसरती करताना दिसतात. उन, वारा, पाऊस काहीही असले तरी त्यांच्या सरावात खंड पडत नाही. मी पोलीस बनणारच, या ध्येयाने प्रेरीत होऊन ते येथे अंगमेहनत करताना दिसतात.पालांदूर परिसरात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. अनेकांनी शेती व त्याशी निगडीत व्यवसाय स्वीकारले आहे. परंतु काहींना शासकीय नोकरीतच तेही पोलीस दलात सहभागी व्हायचे आहे. त्यासाठी त्यांची कठोर परिश्रम करण्याची तयारी असून त्यासाठी ही मंडळी धावपळ करताना दिसत आहे.यापूर्वीचे ठाणेदार अंबादास सुनगार, पालांदुरचे बीट जमादार कचरू शेंडे यांच्या परिश्रमातून आणि लोकसहभागातून येथे सुलभ क्रीडांगण तयार करण्यात आले. याच क्रीडांगणालगत दुमजली अंबर इमारत उभारुन त्यात जीम अर्थात व्यायमशाळा सुरु करण्यात आली.ग्रामीण भागातील मुले कुठेही कमी पडू नये या उदात्त हेतूने पोलीस विभागाने तरुणांसाठी विविध पर्याय खुले करून दिले आहेत. त्यात उपयुक्त पुस्तकांचाही समावेश आहे. गत तीन वर्षात १० ते १२ मुले पोलीस भरतीत सहभागी झाले आहेत हे विशेष.जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक युवराज खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात ही तरुणाई आज एका ध्येयाने प्रेरीत होऊन पोलीस होण्याच्या जिद्दीने प्रयत्न करीत आहेत.तर कवलेवाडा येथील अभ्यास केंद्रातही पुस्तक उपलब्ध होत आहेत. नव्याने रूजू झालेले ठाणेदार दीपक पाटीलही या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.

टॅग्स :Policeपोलिस