शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खतांच्या किमतीत झालेली वाढ कमी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:27 IST

सडक-अर्जुनी : यंदाच्या हंगामात डीएपी, युरिया व मिश्र खत या रासायनिक खताच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे. ही दरवाढ ...

सडक-अर्जुनी : यंदाच्या हंगामात डीएपी, युरिया व मिश्र खत या रासायनिक खताच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे. ही दरवाढ शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरचे असून ती कमी करण्यात यावी, या मागणीला घेऊन १५ मे रोजी सडक अर्जुनी येथील कार्यकर्त्यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांना निवेदन देऊन खताचे दर कमी करण्याची मागणी केली.

केंद्र शासनाने शेतीसाठी लागणाऱ्या रासायनिक खताच्या किमतीत दीड पटीने अधिक वाढ केली आहे. आधीच कर्जाच्या बोज्यात सापडलेला शेतकरी पुन्हा हवालदिल झाल्याशिवाय राहणार नाही. कोविड-१९ कोरोना काळात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाला कवडीमोल किंमत मिळत असून शेतकऱ्यांचे आर्थिक हाल झाले आहेत. आधीच शेतकरी नैसर्गिक आपदा व कोविड-१९ कोरोना संक्रमण काळात आर्थिक संकटात सापडला असून शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. अशा परिस्थितीत शेतीला लागणाऱ्या अनेक वस्तूंच्या किमतीत भरमसाट वाढ झाली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने शेतीला लागणाऱ्या उर्वरकांच्या (रासायनिक खतांच्या) किमतीत वाढ करून शेतकऱ्यांची थट्टाच केली आहे. रासायनिक खतांच्या किमतीत झालेली वाढ कमी करण्यासाठी खा. प्रफुल्ल पटेल यांना माजी जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर, किशोर तरोणे यांनी निवेदन दिले आहे.