शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

तीन दिवसात २.४८ लाखांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:10 IST

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेद्वारे नागपूर मंडळ रेल्वे व्यवस्थापक अमित कुमार यांच्या मार्गदर्शनात व वरिष्ठ

 १०५१ प्रकरणे : विशेष तिकीट तपासणी अभियान लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेद्वारे नागपूर मंडळ रेल्वे व्यवस्थापक अमित कुमार यांच्या मार्गदर्शनात व वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिबल यांच्या नेतृत्वात वाणिज्य विभागाद्वारे १२, १३ व १४ जुलै २०१७ या दिवसी विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. यात मजिस्ट्रेट चेकसुद्धा सम्मिलित आहे. सदर तीन दिवसांत एक हजार ५१ प्रकरणे पकडून त्यांच्याकडून दोन लाख ४८ हजार ७६५ रूपयांचे दंड वसूल करण्यात आले. यात १२ व १३ जुलै रोजी राजनांदगाव स्थानकात किलाबंदी चेकिंग, नागपूर-गोंदिया मार्गावर विशेष कॅम्प कोर्ट चेक व इतवारी-नागभिड मार्गावर एम्बुश चेक करण्यात आले. त्या अंतर्गत विनातिकीट, अनियमित तिकीट व बुक न करताच लगेजचे एक हजार ०५१ प्रकरणे पकडण्यात आले. त्यांच्याकडून दोन लाख ४८ ७६५ रूपये दंडस्वरूपात वसूल करण्यात आले. याशिवाय १३ जुलै रोजी गोंदियात मजिस्ट्रेट श्रीनाथ एन. फड यांच्याद्वारे रेल्वे अधिनियमांतर्गत अनियमित तिकीट, महिला कोचमध्ये आढळलेले व अनधिकृतपणे रेल्वे रूळ ओलांडून जाणाऱ्या ११४ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दंडस्वरूपात २९ हजार ३०० रूपयांची वसुली करण्यात आली. १४ जुलै रोजी इतवारी स्थानकात कॅम्प कोर्टदरम्यान मजिस्ट्रेट यांच्या उपस्थितीत व सहायक वाणिज्य व्यवस्थापक ओमप्रकाश जायस्वाल यांच्या नेतृत्वात विनातिकीट, अनियमित तिकीट व बुक न केलेल्या लगेजचे ५१५ प्रकरणे पकडण्यात आले. त्यांच्याकडून दंडस्वरूपात ९७ हजार ९२० रूपयांची वसुली करण्यात आली. घाण पसरविणारे व धुम्रपान प्रकरणे नोंदविण्यात आले. का झाली नागपूरची निवड? प्रवाशांद्वारे रेल्वे नियमांचे पालन न करणारे तथा योग्य प्रवास तिकीट घेवून निर्धारित गाड्यांच्या नामित बोगींमध्ये प्रवास न केल्यावर त्यांना समस्यांचा सामना करावा लागतो. सीझन तिकीटधारक प्रवाशांना इंटरसिटी एक्सप्रेस (१२८५५/१२८५६) गाडीच्या बोगी क्रमांक एस-६ व एस-७ (अनारक्षित स्लीपर श्रेणी) मध्ये नागपूर ते बिलासपूर व बिलासपूर ते नागपूर तसेच गोंदिया-कोल्हापूर (११०४०) महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये एस-२ ते एस ७ या अनारक्षित स्लीपर श्रेणीच्या बोगींमध्ये केवळ गोंदिया ते नागपूरपर्यंत प्रवासाची अनुमती देण्यात आली. कोल्हापूर-गोंदिया (११०३९) महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये नागपूर ते गोंदिया दरम्यान आरक्षित श्रेणीच्या कोणत्याही बोगीत सीझन तिकीट धारकांना प्रवासासाठी अनारक्षित कोच ठरविले नाही. त्यामुळे सीझन तिकीट धारक प्रवाशांनी प्रवासादरम्यान रेल्वे नियमांचे पालन करून रेल्वे प्रशासनाला सहयोग करण्याचे आवाहन करण्यात आले.