दररोज होत आहे बाधितांच्या संख्येचा ‘रेकॉर्डब्रेक’वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 05:00 IST2021-04-09T05:00:00+5:302021-04-09T05:00:24+5:30
मागील वर्षीपासून कोरोनाने कहर केला असून, मध्यंतरी काही महिन्यांत स्थिती नियंत्रणात आल्याचे दिसत होते. मात्र, नववर्षात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असून, कोरोनाचा कहर पुन्हा सुरू झाला आहे. देशात सर्वात गंभीर स्थिती महाराष्ट्राची असून, त्याचे पडसाद आता जिल्ह्यातही दिसून येत आहेत. मागील वर्षी नव्हती तेवढी रूग्ण संख्या यंदा नोंदली जात आहे. यामुळेच आता परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहे.

दररोज होत आहे बाधितांच्या संख्येचा ‘रेकॉर्डब्रेक’वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना कहर दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालला असून, परिस्थिती आता हाताबाहेर जाताना दिसत आहे. अशीच काहीशी स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली असून, वाढत्या रुग्ण संख्येमुळे धडकी भरू लागली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षापेक्षा यंदाची आकडेवारी जास्त असून, त्यात दररोज भर पडत आहे. यामुळेच यंदा बाधितांच्या संख्येमुळे दररोज ‘रेकॉर्डब्रेक’ होत आहेत.
मागील वर्षीपासून कोरोनाने कहर केला असून, मध्यंतरी काही महिन्यांत स्थिती नियंत्रणात आल्याचे दिसत होते. मात्र, नववर्षात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असून, कोरोनाचा कहर पुन्हा सुरू झाला आहे. देशात सर्वात गंभीर स्थिती महाराष्ट्राची असून, त्याचे पडसाद आता जिल्ह्यातही दिसून येत आहेत. मागील वर्षी नव्हती तेवढी रूग्ण संख्या यंदा नोंदली जात आहे. यामुळेच आता परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहे.
मागील वर्षी बाधितांची संख्या ४०० पर्यंत नोंदविली गेली होती. यंदा मात्र,१५ ते २० दिवसांतच बाधितांची संख्या तब्बल ५०० वर गेली आहे. विशेष म्हणजे, बाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली असून, त्यात दररोज वाढ होतानाच दिसत आहे. हेच कारण आहे की, बाधितांची संख्या आता १८२२० वर गेली आहे.
एकंदर जिल्ह्याची स्थिती बघता दररोज बाधितांची संख्या वाढत असल्याचे दररोज ‘रेकॉर्ड ब्रेक’ होत असून, एक नवा ‘रेकॉर्ड’ तयार होताना दिसत आहे.
आतातरी गांभीर्याने घेण्याची गरज
जिल्ह्यातील बाधितांची आकेडवारी आता ५०० वर जात असून, त्यात वाढ होतच आहे. शिवाय मृतांची संख्याही वाढत असताना नागरिकांत काहीच गांभीर्य दिसून येत नाही. ही मात्र शोकांतिका आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांच्या कितीतरी पट जास्त रूग्ण व मृत्यू गोंदिया तालुक्यातील आहेत. यात शहराचीच आकडेवारी सर्वाधिक असूनही शहरवासीयांना काहीच फरक पडलेला दिसत नाही. मात्र, आताची स्थिती बघता नागरिकांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे.