शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

४७८३ रुपयांची शिफारस, मिळाले फक्त २३६९! धान उत्पादक शेतकऱ्यांची केंद्र सरकारवर नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 16:42 IST

२२ वर्षांत धानाच्या हमीभावात केवळ १८१९ रुपयांची वाढ : खर्च झाला तिप्पट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारने बुधवारी (दि. २८) १४ प्रमुख पिकांचे हमीभाव जाहीर केले. त्यात धानाच्या हमीभावात ६९ रुपयांनी वाढ केली. धानाला आता प्रति क्विंटल २३६९ रुपये हमीभाव मिळणार आहे. सन २०२५-२६ करिता कृषी मूल्य आयोगाने केंद्र सरकारकडे धानाला प्रति क्विंटल ४७८३ रुपये हमीभाव मिळण्याची शिफारस केली होती. पण, त्या तुलनेत मात्र धानाला अर्थाच हमीभाव मिळाला. उत्पादन खर्चाच्या तुलनेत धानाला मिळणारा हमीभाव कमी असल्याने जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. 

पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या पाच जिल्ह्यांत धानाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. या पाचही जिल्ह्यांत धानाचे १७ लाख हेक्टरवर क्षेत्र आहे. धानाच्या लागवड खर्चात दरवर्षी वाढत होत असून, त्या तुलनेत धानाला मिळणारा दर हा कमी असल्याने धानाची शेती म्हणजे शेतकऱ्यांसाठी तोट्याचा सौदा होत चालला आहे. त्यामुळेच धान उत्पादक शेतकरी आता इतर पीक घेण्याकडे वळत असल्याचे चित्र आहे.

गेल्या २२ वर्षांत धानाच्या हमीभावात केवळ १८१९ रुपयांची वाढ झाली असून, उत्पादन खर्च मात्र तिप्पट वाढला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२४-२५ खरीप हंगामातील धानाच्या हमीभावात १८३ रुपयांनी वाढ केली होती. त्यामुळे धानाला प्रति क्विंटल २३०० रुपये हमीभाव मिळाला. सन २०२५-२६ करिता कृषी मूल्य आयोगाने केंद्र सरकारकडे धानाला ४७८३ रुपये हमीभाव मिळण्याची शिफारस केली. पण, प्रत्यक्षात केंद्र सरकारने केवळ ६९ रुपयांची वाढ केली आहे.

खते, बियाण्यांच्या किमती झाल्या दुप्पटधानशेतीच्या लागवड खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. खते, बियाणे, मजुरी व इतर खर्चात भरमसाट वाढ झाली आहे. २० वर्षापूर्वी धानाच्या शेतीचा एकरी लागवड खर्च १२ ते १३ हजार रुपये होता. तो आता २२ ते २५ हजारांवर पोहोचला आहे. पण, त्या तुलनेत हमीभाव मिळत नसल्यानेशेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

"धानाच्या लागवड खर्चात पाचपट वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरातसुद्धा वाढ झाल्याने त्याचासुद्धा परिणाम लागवड खर्चावर होत आहे. त्यामुळे धानाच्या हमीभावात भरीव वाढ होणे अपेक्षित होते."- चिंतामण रहांगडाले, धान उत्पादक शेतकरी.

"धानाच्या शेतीचा एकरी लागवड खर्च २२ ते २५ हजार रुपये आहे. तर एकरी १५ ते १८ क्विंटल धानाचे उत्पादन होते. सर्व खर्च जाता शेतकऱ्यांच्या हातात केवळ तीन ते चार हजार रुपये शिल्लक राहतात. त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा?"- मन्साराम चिखलोंढे, शेतकरी

टॅग्स :gondiya-acगोंदियाPaddyभातCropपीकfarmingशेतीFarmerशेतकरी