‘वन बूथ-टेन यूथ’ अभियान गावागावांत पोहचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 00:38 IST2019-01-19T00:36:15+5:302019-01-19T00:38:12+5:30
नोटबंदी, बेरोजगारी, जीएसटी, कर्जमाफी, सी.एम.चषक ही भाजपची फसवेगिरी आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी यासह इतर मुद्यांवर अभ्यास करुन युवकांना जागरूक करणे गरजेचे आहे. भाजप सरकारच्या फसव्या योजनांबाबत युवकांनी प्रहार केला पाहिजे.

‘वन बूथ-टेन यूथ’ अभियान गावागावांत पोहचवा
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : नोटबंदी, बेरोजगारी, जीएसटी, कर्जमाफी, सी.एम.चषक ही भाजपची फसवेगिरी आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी यासह इतर मुद्यांवर अभ्यास करुन युवकांना जागरूक करणे गरजेचे आहे. भाजप सरकारच्या फसव्या योजनांबाबत युवकांनी प्रहार केला पाहिजे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात जावून कमीतकमी १० युवकांना सदस्य बनवून त्यांचे ओळखपत्र तयार करा. जिल्ह्यातील गावागावांत ‘वन बुथ- टेन युथ’ अभियान पोहोचवा असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉँग्रस पक्षाचे माजी आमदार जैन यांनी केले.
राष्टÑवादी युवक काँग्रेसच्यावतीने येथील राष्ट्रवादी कॉँग्रेस भवनमध्ये आयोजीत विशेष सभेत रविवारी (दि.१३) पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या सभेमध्ये ‘वन बुथ टेन युथ’ अभियानाला सुरूवात करण्यात आली. सभेत प्रदेश कार्यकारिणी सचिव विनोद हरिणखेडे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक कॉँग्रसच्यावतीने प्रत्येक तालुक्यात सभा घेऊन युवक राष्टÑवादी कॉँग्रेस अधीक बळकट करावी असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. प्रास्तावीक राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किशोर तरोणे यांनी मांडले. संचालन तालुकाध्यक्ष जितेश टेंभरे यांनी केले.
सभेला सालेकसा कार्याध्यक्ष निकेश गावळ, आमगाव तालुकाध्यक्ष तिरथ येटरे, गोरेगाव तालुकाध्यक्ष राजकुमार बोपचे, सडक-अर्जुनी तालुकाध्यक्ष दिनेश कोरे, तिरोडा कार्याध्यक्ष डॉ. निम्रेश पटले, तिरोडा तालुकाध्यक्ष देवेंद्र चौधरी, सहअध्यक्ष वासीम शेख, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी गहाणे, निप्पल बरैय्या, आशिष येळणे यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.