शिधापत्रिकाधारकांनी आधार क्र मांक द्यावा
By Admin | Updated: October 30, 2016 01:49 IST2016-10-30T01:49:15+5:302016-10-30T01:49:15+5:30
रेशन कार्डवरुन प्रत्येक सदस्यांचे आधार क्र मांक प्राप्त करु न घेण्याच्या अनुषंगाने सर्व शिधापत्रिका धारकांनी नोव्हेंबर २०१६ पर्यंत

शिधापत्रिकाधारकांनी आधार क्र मांक द्यावा
गोंदिया : रेशन कार्डवरुन प्रत्येक सदस्यांचे आधार क्र मांक प्राप्त करु न घेण्याच्या अनुषंगाने सर्व शिधापत्रिका धारकांनी नोव्हेंबर २०१६ पर्यंत त्यांच्या शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक संबंधित रास्तभाव दुकानदाराकडे जमा करावे असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
जे शिधापत्रिकाधारक आधार क्र मांक उपलब्ध करु न देणार नाही त्यांची नावे शिधापत्रिकेतून काढण्यात येईल. त्यानंतर त्यांच्या नावांचा नव्याने समावेश करण्यात येणार नाही. अन्न सुरक्षा योजनेअंतर्ग अंत्योदय व प्राधान्य गटातील शिधापत्रिकेत समाविष्ट सर्व व्यक्तीच्या आधार क्रमांकाची नोंदणी करणे आवश्यक आहे. आधार कायदा २०१६ च्या कलम ७ नुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समाविष्ट असलेल्या व नव्याने समाविष्ट करण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांचे आधार क्र मांक असणे आता अनिवार्य आहे.
सद्यस्थितीत अन्नधान्याची उचल करणाऱ्या शिधापत्रिकेत समाविष्ट सर्व सदस्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. ज्या शिधापित्रकेतील सदस्यांचे आधार क्र मांक प्राप्त नसल्याचे जवळच्या केंद्रावर जावून आधार नोंदणी करु न घ्यावी. केंद्र शासनाने यापुर्वी सधन गॅसधारक कुटुंबांना स्वेच्छेने गॅसवरील अनुदान सोडण्याचे आवाहन केले होते व नागरिकांनी स्वच्छेने अनुदान सोडले होते. त्याच अनुषंगाने जे शिधा पत्रिकाधारक सवलतीच्या दराने धान्याचा हक्क सोडू इच्छितात त्यांना अन्न धान्य उचल न करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. अशा शिधा पत्रिकाधारकांनी तहसिलदारामशी संपर्क साधावा.
ज्या शिधापत्रिका धारकांकडे गॅस नाही असे शिधापत्रिकाधारक केरोसीन मिळण्यास पात्र आहेत व अशा शिधापत्रिकाधारकांना केरोसीनचा पुरवठा करण्यात येत आहे. सर्व शिधापत्रिकाधारकांनी त्यांचे आधार क्र मांक व भ्रमणध्वनी क्र मांक तात्काळ सादर करावे.
भ्रमणध्वनी क्र मांक शक्यतो कुटुंब प्रमुखाचा असावा. कुटुंब प्रमुखाकडे भ्रमणध्वनी नसल्यास कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा भ्रमणध्वनी चालू शकेल. जे शिधा पत्रिकाधारक आधार क्रमांक व भ्रमणध्वनी क्र मांक सादर करणार नाही त्यांना नोव्हेंबर २०१६ पासून अनुदानीत दराचा कोटा देण्यात येणार नाही.
अशा लाभार्थ्यांचा कोटा राखून ठेवण्यात येईल. केरोसीन मिळण्यास पात्र सर्व शिधा पत्रिकाधारकांनी ३१ आॅक्टोबर २०१६ पर्यंत त्यांचे आधार क्र मांक व मोबाईल क्र मांक त्वरित तहसील कार्यालय व संबंधित रास्तभाव दुकानदार व केरोसीन विक्र ेते यांचेकडे जमा करावे असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केले आहे.(शहर प्रतिनिधी)