तस्करांसाठी रान मोकळे

By Admin | Updated: September 3, 2014 23:29 IST2014-09-03T23:29:13+5:302014-09-03T23:29:13+5:30

वनकर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत कोणतीही सुधारित निती तयार न झाल्यामुळे ३५ वर्षांपासून अन्यायग्रस्त असलेल्या वनरक्षक, वनपालांनी २५ आॅगस्टपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाचा बुधवारी

Rane free for smugglers | तस्करांसाठी रान मोकळे

तस्करांसाठी रान मोकळे

दहावा दिवस : महाराष्ट्र वनरक्षक, वनपाल संघटना संपावर
गोंदिया : वनकर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत कोणतीही सुधारित निती तयार न झाल्यामुळे ३५ वर्षांपासून अन्यायग्रस्त असलेल्या वनरक्षक, वनपालांनी २५ आॅगस्टपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाचा बुधवारी दहावा दिवस असून एका कर्मचाऱ्यांने मुंडण करून शासनाचा निषेध केला आहे.
वनरक्षक, वनपाल हे वर्ग ३ चे पद असून भारतीय वन कायद्यानुसार तो अधिकारी आहे. असा देखावा केला जातो. १९६२ पासून वर्ग ३ च्या पदास वर्ग ४ ची वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे. या झालेल्या अन्यायाबाबत शासनाला वारंवार निवेदन करून शांततेच्या मार्गाने वेतनश्रेणीमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव अनेक वेळा पाठविण्यात आला. परंतु सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून वनरक्षक वनपालाची अवहेलना केली आहे. वनमंत्री, वनसचिव, अर्थमंत्री व मुख्यमंत्री यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवून कर्मचारी हताश झाले. नक्षलग्रस्त भागात, दऱ्या-खोऱ्यात व अतिदुर्गम भागात दळणवळणाची सुविधा नसताना वनरक्षक वनपाल तुटपुंज्या वेतनावर कामे करतात. परंतु शासनाने त्यांच्याकडे लक्ष न दिल्यामुळे २५ आॅगस्टपासून संप पुकारण्यात आला आहे. वेतनश्रेणीत सुधारणा करणे, वनसंरक्षणात कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटूंबीयांना १० लाख नुकसान भरपाई देणे, बिट रक्षकावर व्यतिरीक्त काम लादू नये, पोलीस विभागाप्रमाणे सोई सवलती व भत्ते देण्यात यावे, वनरक्षक वनपालांना कायमचा प्रवास भत्ता देणे या मागण्यांना घेऊन कामबंद आंदोलन पुकारण्यात आले. मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाचा फायदा वनमाफीय घेत आहेत. जंगलात अधिकारी, कर्मचारी नाही. त्यामुळे वन्यप्राण्याची शिकार अवैध वृक्षतोड वाढली आहे. नागझिरा अभयारण्यात बहेलिया समाजाची टोळी सक्रिय झाली आहे. या वनकर्मचाऱ्यांच्या संपामुळे वनमाफियासाठी रान मोकळे झाले आहे. परंतु वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी एकही नुकसान झाल्याचे दाखवित नाही. संपाचा लढा तिव्र करण्यात येणार आहे. सदर आंदोलन केंद्रीय अध्यक्ष विजय मेहर, विभागीय अध्यक्ष एल.एस.भुते, सचिव पी.बी.चन्ने, उपाध्यक्ष आर.व्ही.ब्राम्हणे, एस.एम.काळबांधे, व्ही.आर. अवस्थी, एस.व्ही.भदाणे, एल.एन.बंसोड, गुलाब पठाण, छगन गोंडाणे, आर.एस. ब्राम्हणकर, आनंद मेश्राम, आर.जे.भांडारकर, जितेंद्र बघेले, आर.एम.नागपुरे, ए.जी.माहुले, के.एन.फुंडे, एल.आर.लिल्हारे, एस.एम.पवार, एस.एल.नागपुरे, लतिफ पठाण, एस.एम.हरडे यांच्या नेतृत्वात संप पुकारण्यात आला आहे.
सालेकसा : महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटना तालुका सालेकसाचे कर्मचारी आपल्या विविध मागण्यासंदर्भात महाराष्ट्र पातळीवरील बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे जंगलाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वनरक्षक-वनपाल पदाचे अन्यायकारक वेतनश्रेणी सुधारणा करणे, वनसरंक्षणात कर्मचारी मृत्यू पावल्यास त्याचे कुटूंबियांना इतर राज्याचे तरतूदीनुसार रु. १० लाख नुकसान भरपाई देण्यात यावी. बिट रक्षकावर फक्त वनसंरक्षणाचे व्यतिरीक्त इतर जास्तीचे कामे लादू नये. पोलीस विभागाप्रमाणे कर्मचाऱ्यांना सोयी व सवलती, भत्ते देण्यात यावे, वनपाल, वनरक्षक यांना कायम प्रवासभत्ता मंजूर करणे, या मागण्यासाठी वनकर्मचारी बेमुदत संपावर गेलेले आहे. याबाबतची लेखी महिती वनपरिक्षेत्राधिकारी वि.जे. देंडे यांना देण्यात आली. संपात पी.एस. मेंढे, एल.एस.भुते, आर.एस. भगत, डी.एम.गोरे, एस.जी.बुंदेले, आर.ओ.दशरिया, जि.एम.रहांगडाले, एस.एम.लांजेवार, डी.के.रंगारी, बी.पी.साखरे, डी.ए.वैद्य, ई.सी.कापसे, एस.बी.कटरे, एस.एल.पांडे, के.एस.बिसेन व इतर कर्मचारी सहभागी झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Rane free for smugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.