मालीजुंगा येथे रानडुकराची शिकार
By Admin | Updated: September 18, 2014 23:37 IST2014-09-18T23:37:15+5:302014-09-18T23:37:15+5:30
सडक/अर्जुनी तालुक्यातील पांढरी परिसरातील मालीजुंगा येथील निवासी सुरेश गणाजी कापगते (५०) यांच्या शेतशिवारामध्ये जंगली रानडुकराची शिकार करण्यात आली.

मालीजुंगा येथे रानडुकराची शिकार
पांढरी : सडक/अर्जुनी तालुक्यातील पांढरी परिसरातील मालीजुंगा येथील निवासी सुरेश गणाजी कापगते (५०) यांच्या शेतशिवारामध्ये जंगली रानडुकराची शिकार करण्यात आली.
गट नं. ८६/२/२, पटवारी हलका नंबर ११,०.८१ आराजी यांच्या मालकीची जमीन असून वनविभागाचे कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना काही संशयास्पद आवाज ऐकून आला. त्यावर वनविभागाचे कर्मचारी आवाजाच्या दिशेने समोर जाऊ लागले. त्यांना काही व्यक्ती जमिनीमध्ये काही कापताना आढळले. वनविभागाच्या कर्मचारी वर्गाने जवळ जाऊन बघितले असता शिकारी तेथून पसार झाले.
चौकशी केली असता त्या ठिकाणी रानडुकराचे तीन मोठे तुकडे केलेले दिसले. यावरून शिकारी मांस विक्रीला नेण्याच्या तयारीत होते, असा अंदाज वर्तविला जात आहे. घटनास्थळी २ कुऱ्हाड, २ सायकली, तारेचे कुंपन व लाकडी दांडके आदी सामग्री मिळाली. त्यांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जप्त केले.
चौकशीकरिता वनपरिक्षेत्र अधिकारी सडक/अर्जुनी जी.एस. राठोड यांना पाठविण्यात आले होते. यामध्ये २ रानडुक्कर मारण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यापैकी एक डुक्कर कुजलेल्या अवस्थेमध्ये तर दुसरा डुक्कर चांगल्या अवस्थेमध्ये तिथे आढळला. कृष्णकुमार बोपचे पो.पा. रेंगेपार, सरयुकुमार बिसेन, चुडामन पुस्तोडे यांना साक्षीदार म्हणून ठेवण्यात आले होते. पशुवैद्यकीय अधिकारी बबनराव कांबळे यांनी शवविच्छेदन केले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पीओआर जमिन मालकाच्या नावे फाडून वरील चौकशी अधिकारी जे.जी. खोब्रागडे व वनरक्षक कु.पी.के. नंदागवळी करीत आहेत. (वार्ताहर)