राम मंदिर आचार-विचारांंचे मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:24 IST2021-01-15T04:24:21+5:302021-01-15T04:24:21+5:30
आमगाव : प्रभू श्रीराम हे स्वत: धर्माचे प्रतीक आहेत. अयोध्येमध्ये धर्माचे प्रतीक निर्माण होत आहे. धर्म स्थापनेकरिता आता आपण ...

राम मंदिर आचार-विचारांंचे मंदिर
आमगाव : प्रभू श्रीराम हे स्वत: धर्माचे प्रतीक आहेत. अयोध्येमध्ये धर्माचे प्रतीक निर्माण होत आहे. धर्म स्थापनेकरिता आता आपण कार्य करणार आहोत. राम मंदिर आचार- विचारांचे मंदिर बनणार आहे, असे प्रतिपादन महात्यागी संस्थान तिरखेडीचे अध्यक्ष ग्यानीराम महाराज यांनी केले.
श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी समर्पण अभियान आमगाव तालुका कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. ते म्हणाले की, भव्य मंदिर निर्माण करण्याकरिता नि:संकोच भावनेने दान करावे. सामर्थ्यानुसार दान करावे. हे एक सामाजिक कर्तव्य आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, न्यास निधी समर्पण महाअभियान आमगाव तालुका कार्यालयाचे स्थानिक मानकर चौकात १३ जानेवारीला करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बजरंग दलाचे महाराष्ट्र-गोवा क्षेत्राचे क्षेत्रीय संयोजक देवेश मिश्रा, तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजप जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर, गिधाडी आश्रमाचे परमपूज्य यशेश्वरानंदजी महाराज, अभियानाचे तालुका संयोजक बंटी शर्मा, महात्यागी संस्थानचे सचिव जे.जी. अंबुले, माजी आमदार भेरसिंह नागपुरे उपस्थित होते. देवेश मिश्रा म्हणाले, श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम होते. म्हणून, आम्हाला मर्यादा पुरुषोत्तम राजाचा अभिमान आहे. राम मंदिर जनतेच्या सहकार्याने बनणार आहे. श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माणाकरिता निधीसंग्रह व गृहसंपर्क अभियान १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान करण्यात येणार आहे. संचालन अभियानाचे तालुका सहसंयोजक सुनील अंबुले यांनी केले. प्रांत सहसंयोजक नवीन जैन, बजरंग दल जिल्हा सहसंयोजक बालाराम व्यास, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर कार्यवाह दिनेश शेंडे, नरेंद्र बाजपेई, भाजपा तालुकाध्यक्ष काशिराम हुकरे, रा.स्व. संघ नगर सहकार्यवाह रमेश सोनी, अशोक शेंडे, मुरलीधर करंडे, जनार्दन तडस, शंकर शेंडे, सुरेश शेंडे, प्रवीण पटले, अतुल साखरकर, चंद्रकुमार पटले, राजेश जगधते, राजू पटेल यांनी परिश्रम घेतले.