लोकमत न्यूज नेटवर्कखजरी : सडक अर्जुनी तालुक्यातील राका ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्य राकाटोला येथे भीषण पाणी टंचाई आहे. भल्या पहाटेपासूनच महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. मात्र याकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष झाले असल्याने गावकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये म्हणून ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासन यांच्यामार्फत नियोजन करुन नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करुन दिली जाते. मात्र राका ग्रामपंचायत अंतर्गत राकाटोला येथे पाणी टंचाईची गंभीर स्थिती असताना त्यावर अद्यापही कुठलीही उपाय योजना करण्यात आली नाही. मागील एक महिन्यापासून या गावात पाण्याची टंचाई आहे.राका ग्रामपंचायत अंतर्गत राकाटोला येथे आदिवासी लोकांची तीस ते चाळीस घर असून या भागात एक विंधन विहीर तर दुसरा सौर ऊर्जेचा पंप आहे. या गावात अंदाजे १७० महिला व पुरुष असून बहुतांशी आदिवासी आहेत. मागील महिन्यात वादळी वाºयामुळे सौर पंपाचे पॅनल तुटले तेव्हापासून दुसरे पॅनल लावण्यात आले नाही. त्यामुळे सदर बोअरवेल बंद पडले आहे.ग्रामपंचायतने अद्यापही सदर सौर पॅनल दुरूस्ती करण्यासाठी पुढाकार न घेतल्याने येथील गावकºयांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. राकाटोला येथील गावकरी तहान भागविण्यासाठी तुलाराम भेंडारकर यांच्या गावाबाहेर असलेल्या विहिरीचे पाणी आणत आहे. तर गावातील बोअरवेल आणि विहिरीवर पाणी भरण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते.जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देवून पाणी टंचाईची समस्या मार्गी लावण्याची मागणी गावकºयांकडून केली जात आहे.
राकाटोला येथे भीषण पाणी टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 22:10 IST
सडक अर्जुनी तालुक्यातील राका ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या राकाटोला येथे भीषण पाणी टंचाई आहे. भल्या पहाटेपासूनच महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. मात्र याकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष झाले असल्याने गावकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.
राकाटोला येथे भीषण पाणी टंचाई
ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : महिलांची पाण्यासाठी भटकंती, गावकऱ्यांमध्ये संताप