शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजकुमार बडोलेंना उमेदवारी; मविआकडून उमेदवार कोण असणार? लागले सर्वांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 16:27 IST

Gondia : नवीन समीकरण कितपत प्रभावी ठरणार? लागले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : महायुतीचे गोंदिया जिल्ह्यातील चारही उमेदवार ठरले; मात्र, महाविकास आघाडीच्या उमेदवारांची अद्यापही घोषणा झाली नसल्याने लढतीचे चित्र अद्याप अस्पष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने बुधवारी जाहीर केलेल्या यादीत राजकुमार बडोले यांच्या नावाचा समावेश आहे. महायुतीतील भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने काही जागांवर उमेदवारांची अदलाबदली करण्याचा प्रयोग राबविला. हा प्रयोग अर्जुनी मोरगाव मतदारसंघात कितपत प्रभावी ठरतो हेदेखील महत्त्वपूर्ण आहे.

लोकसभा निवडणुकीत अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला २८ हजार मतांचा खड्डा पडला होता. हा खड्डा महायुतीतील मित्रपक्षाच्या मतदारांनी महायुतीच्या उमेदवाराला मतदान न केल्याने व महायुतीविरोधी लाट असल्याने पडल्याचे बोलले जात होते. यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपसुद्धा झाले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने विद्यमान आ. मनोहर चंद्रिकापुरे यांचे तिकीट कापून राजकुमार बडोले यांना उमेदवारी जाहीर केली. बडोले यांचे आता चिन्ह बदलले आहे. त्यामुळे लोकसभेतील हिशेब विधानसभेत पूर्ण करण्याच्या तयारीत काही जण आहेत. 

महायुतीने वरिष्ठ पातळीवर चांगली मोट बांधली आहे; पण अशीच मोट बडोले यांच्या ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील प्रवेशानंतर बांधली जाणार का? बडोले यांचे भाजपमधील मताधिक्य कायम राहणार का? महायुतीतील तिन्ही पक्षांत योग्य समन्वय साधण्यासाठी हनुमानाची भूमिका कोण पार पाडणार यावरच बरीच समीकरणे अवलंबून आहेत.

महाविकास आघाडीचा उमेदवार कोण?गोंदिया, अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील तिढा अद्यापही सुटलेला नाही. पण, उमेदवारी निश्चित समजून दोन्ही मतदारसंघांतील काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण, हे अद्यापही जाहीर झालेले नाही.

दोन मतदारसंघात बंडखोरी निश्चिंतमहाविकास आघाडीत अर्जुनी मोरगाव आणि गोंदिया या दोन मतदारसंघांत बंडखोरी होणे निश्चित आहे. अर्जुनी मोरगाव मतदारसंघात उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच बाहेरचे पार्सल चालणार, असा सूर आळवला जात आहे. तर गोंदिया विधानसभा मतदारसंघात उद्धवसेनेने टोकाची भूमिका घेत अंतर्गत तयारी सुरू केली आहे. त्यामुळे येथे बंडखोरी निश्चित आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४gondiya-acगोंदियाRajkumar Badolayराजकुमार बडोलेNCPराष्ट्रवादी काँग्रेस