राजाभोज क्षत्रीय पोवार समाजाची कार्यकारिणी घोषित

By Admin | Updated: December 27, 2014 02:06 IST2014-12-27T02:06:42+5:302014-12-27T02:06:42+5:30

तालुक्यातील पोवार समाज बांधवाची सभा गडमाता मंदिर सालेकसाच्या सभागृहात घेण्यात आली. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक मुन्नालाल येळे होते.

Rajbhoj Kshatriya Powar Samaj's Executive declared | राजाभोज क्षत्रीय पोवार समाजाची कार्यकारिणी घोषित

राजाभोज क्षत्रीय पोवार समाजाची कार्यकारिणी घोषित

सालेकसा : तालुक्यातील पोवार समाज बांधवाची सभा गडमाता मंदिर सालेकसाच्या सभागृहात घेण्यात आली. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक मुन्नालाल येळे होते. यावेळी कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
यावेळी जे.एल. पटले, पियसलाल कटरे, नरेंद्र कटरे, गुणवंत बिसेन, युवराज कटरे, आर.डी. रहांगडाले, गंगाधर कटरे, रामेश्वर कटरे, जैचंद कटरे, इंदूलाल पटले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
पदाधिकारी व अध्यक्षांची निवड दरवर्षी रोटेशन पध्दतीने करण्याचा ठराव या सभेत घेण्यात आला. दरम्यान अध्यक्ष पदावर उमेदलाल जैतवार, उपाध्यक्ष कृष्णा पटले, मनोज बोपचे जैलाल पटले, मनोज शरणागत, सचिव मधुकर हरिणखेडे सहसचिव रमेश रहांगडाले, प्रमेश बिसेन, कोषाध्यक्ष पप्पु राणे, प्रचार प्रसिध्दी प्रमुख गौरीशंकर बिसेन, नेपाल पटले, संगठक रमेश बिसेन, संतोष रहांगडाले, झनक तुरकर, गादीप्रसाद भगत आणि कार्यकारी सदस्य म्हणून डॉ. धवल बघेले, दिनेश येळे, छगनलाल कटरे, दिलीप बिसेन, राजेश कटरे, मधुकर कटरे, ओमप्रकाश पारधी, राजेंद्र टेंभरे, सुर्यकांत येळे, मुन्नालाल ठाकूर, दिलीप कटरे, पवन पटले, विजय ठाकरे, संतोष ठाकरे, राजहंस पारधीकर, सुरेंद्र बिसेन, मुकेश बघेले, आर.पी. सोनवाने, प्रदीप बोपचे, टोलीराम रहांगडाले, मनोज कटरे, रतनलाल टेंभरे यांची निवड करण्यात आली. संचालन पप्पु राणे यांनी केले. कृष्णकुमार पटले, मनोज शरणागत, गौरीशंकर बिसेन, राजेंद्र बिसेन यांनी सहकार्य केले.

Web Title: Rajbhoj Kshatriya Powar Samaj's Executive declared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.