जिल्ह्यात पावसाची रिपरिप कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:30 IST2021-07-28T04:30:42+5:302021-07-28T04:30:42+5:30

गोंदिया : जिल्ह्यात सोमवारी (दि. २६) सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाची रिपरिप मंगळवारी दुसऱ्या दिवशी दिवसभर कायम होती. पावसामुळे रोवणीच्या ...

Rains continue in the district | जिल्ह्यात पावसाची रिपरिप कायम

जिल्ह्यात पावसाची रिपरिप कायम

गोंदिया : जिल्ह्यात सोमवारी (दि. २६) सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाची रिपरिप मंगळवारी दुसऱ्या दिवशी दिवसभर कायम होती. पावसामुळे रोवणीच्या कामाला वेग आला असून, बळीराजा शेतीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र आहे.

हवामान विभागाने यंदा पावसाचा वर्तविलेला अंदाज चुकल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. जुलै महिना संपत आला तरी पावसाने दमदार हजेरी लावली नव्हती. त्यामुळे जिल्ह्यातील रोवणीची कामे खोळंबली होती, तर २७ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात केवळ ४४ टक्के रोवणी झाली होती. धानाच्या रोवणीसाठी १५ ऑगस्टपर्यंतचा कालावधी अनुकूल मानला जातो. त्यानंतर रोवण्या लांबल्यास त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. यंदा पावसाअभावी सिंचन प्रकल्पातसुद्धा २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची काळजी वाढली होती. मात्र सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर मंगळवारी दुसऱ्या दिवशीदेखील कायम होता. त्यामुळे तलाव आणि शेतातील बांध्यामध्ये पाणी साचल्याचे चित्र आहे. या पावसामुळे रोवणीच्या कामाला वेग आल्याचे चित्र आहे.

..........

मागील २४ तासांत तालुकानिहाय पडलेला पाऊस

गोंदिया : १६.१ मिमी

आमगाव : १९.० मिमी

तिरोडा : ११.२ मिमी

गोरेगाव : १९.१ मिमी

सालेकसा :१३.३ मिमी

देवरी : ४.७ मिमी

अर्जुनी मोरगाव : ३.९ मिमी

सडक अर्जुनी : ५.४ मिमी

......

एकूण सरासरी : ११.३ मिमी

Web Title: Rains continue in the district