पोलिसांवर शुभेच्छांचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 06:00 AM2019-12-07T06:00:00+5:302019-12-07T06:00:12+5:30

हैदराबाद येथील तरूणीवर पाशवी अत्याचार करून तिला ठार करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. देशात ही पहिली- वहिली घटना नव्हती. यापूर्वीही कित्येक तरूणींनाच जीव गेला असून त्यांचे प्रकरण न्यायालयात अंतिम निर्णयाच्या प्रतिक्षेत असून आरोपी सरकारी पाहुणे बनले आहेत.

Rain showers on the police | पोलिसांवर शुभेच्छांचा वर्षाव

पोलिसांवर शुभेच्छांचा वर्षाव

Next
ठळक मुद्देसामाजिक संघटनांकडून कौतुक : अशा घटनांवर आळा बसणार असल्याचा विश्वास

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : हैदराबाद येथील डॉक्टर तरूणीवर अत्याचार करून तिला ठार मारणाऱ्या चारही आरोपींना पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केले. अनपेक्षित अशा या घटनेने सर्वत एकच खळबळ माजली असतानाच महिलांनी पोलिसांच्या या कामगिरीला सॅल्यूट केला. एवढेच नव्हे तर येथील महिलांच्या काही सामाजिक संघटनांनी पोलीस ठाण्यात जावून पोलिसांना पुष्पगुच्छ देत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
हैदराबाद येथील तरूणीवर पाशवी अत्याचार करून तिला ठार करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. देशात ही पहिली- वहिली घटना नव्हती. यापूर्वीही कित्येक तरूणींनाच जीव गेला असून त्यांचे प्रकरण न्यायालयात अंतिम निर्णयाच्या प्रतिक्षेत असून आरोपी सरकारी पाहुणे बनले आहेत. हैदराबाद येथील घटना व त्यावर पोलिसांनी गुरूवारी (दि.५) मध्यरात्री दिलेला अंतिम निर्णय हा मात्र अन्य घटनांपेक्षा वेगळा ठरला. पोलिसांनी प्रकरणातील चारही आरोपींचा एन्काऊंटर करून यमसदनी धाडले.
या घटनेचे सर्वच स्तरातून स्वागत केले जात असतानाच महिलांनी या घटनेनंतर जास्तच आनंद व्यक्त केला. एवढेच नव्हे तर अशा आरोपींना अशीच शिक्षा देण्यात यावी अशा प्रतिक्रीयाही व्यक्त केल्या जात आहेत. सर्वत्र या घटनेची चर्चा व स्वागत केले जात असल्याचे शुक्रवारी (दि.६) बघावयास मिळाले. विशेष म्हणजे, येथील आधार महिला शक्ती संघटनेसह अन्य काही सामाजिक संघटनांनीही पोलीसांच्या कामगिरीचे कौतुक केले. महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छांचा वर्षाव केला.

सोशल मीडियावर एन्काऊंटरचीच धूम
चारही आरोपींना यमसदनी धाडण्यात आल्याचे वृत्त कळताच सोशल मीडियावर सर्वांनीच या घटनेचे स्वागत केले. फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप अन्य माध्यमांवर दिवसभर तेलंगणा पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले. कित्येकांनी अत्याचारातील अन्य प्रकरणांतील आरोपींनाही अशीच शिक्षा देऊनपीडितांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही केली आहे.

Web Title: Rain showers on the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस