रेल्वे सुरक्षा जवानाने वाचविले युवकाचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 05:00 IST2019-12-26T05:00:00+5:302019-12-26T05:00:13+5:30

गोंदिया रेल्वे स्थानकावर मंगळवारी घडली.अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अमन सुरेंद्र वैद्य (२०) असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. तो चिचगड बालाघाट येथील रहिवासी आहे.बालाघाट-गोंदिया डेमो लोकल रेल्वे गोंदिया प्लॅटफॉर्म क्र मांक १ वर आली असता एक युवक आपल्या नातेवाईकांना ट्रेनमध्ये बसविण्यासाठी चढला होता.

Railway security man rescues young man's life | रेल्वे सुरक्षा जवानाने वाचविले युवकाचे प्राण

रेल्वे सुरक्षा जवानाने वाचविले युवकाचे प्राण

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : चालत्या रेल्वे गाडीतून उतरताना पाय घसरल्याने रेल्वे रुळांमध्ये पडलेल्या युवकाचे प्राण कर्तव्यावर तैनात असलेल्या रेल्वे सुरक्षा जवानाने वाचविले. ही घटना गोंदिया रेल्वे स्थानकावर मंगळवारी घडली.अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
अमन सुरेंद्र वैद्य (२०) असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. तो चिचगड बालाघाट येथील रहिवासी आहे.बालाघाट-गोंदिया डेमो लोकल रेल्वे गोंदिया प्लॅटफॉर्म क्र मांक १ वर आली असता एक युवक आपल्या नातेवाईकांना ट्रेनमध्ये बसविण्यासाठी चढला होता. अचानक ट्रेन सुरु झाल्याने तो तरुण चालत्या गाडीतून उतरण्याच्या प्रयत्न करीत असताना त्याचा पाय घसरून तो सरळ रेल्वे रुळांच्या आत पडला. तो चालत्या रेल्वे गाडीच्या आत पडत असल्याचे पाहुन त्या ठिकाणी आपले कर्तव्य बजावित असलेल्या रेल्वे सुरक्षा जवान चंद्रकांत बघेल यांना दिसताच त्यांनी लगेच त्याला ओढूत बाहेर काढले. नशीब बलवत्तर होते म्हणून तरूणाचे प्राण थोडक्यात वाचले.

Web Title: Railway security man rescues young man's life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे