रेल्वे प्रशासनाने कठोर कारवाई करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 21:57 IST2017-08-26T21:57:38+5:302017-08-26T21:57:55+5:30
येथील रेल्वे स्थानकावर १७ आॅगस्टच्या रात्री १०.३० वाजता पोहोचलेली ट्रेन (५८११७) झारसुकडा-गोंदिया पॅसेंजरमध्ये गोंदियाची महिला सूरजदेवी राजेंद्रकुमार जैन यांचा मृतदेह आढळला.

रेल्वे प्रशासनाने कठोर कारवाई करावी
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील रेल्वे स्थानकावर १७ आॅगस्टच्या रात्री १०.३० वाजता पोहोचलेली ट्रेन (५८११७) झारसुकडा-गोंदिया पॅसेंजरमध्ये गोंदियाची महिला सूरजदेवी राजेंद्रकुमार जैन यांचा मृतदेह आढळला. मृतदेहाची स्थिती पाहून कुटुंबातील सदस्य स्तब्ध झाले. या प्रकरणाबाबत मृत महिलेचे कुटुंबीय व जैन समाजबांधवांनी आमदार गोपालदास अग्रवाल यांची भेट घेतली व प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषींना अटक करण्याची मागणी केली.प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आ. अग्रवाल यांनी रेल्वेच्या उच्च अधिकाºयांसह चर्चा केली.
आ. अग्रवाल यांच्या उपस्थितीत रेल्वे स्थानक सभागृहात आरपीएफ नागपूरचे डीएससी ए.के. स्वामी, एसडीओपी निलेश राऊत, डीसीएम डी.एस. तोमर, सीएमओ डॉ. सुगंधा राहा, वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. विनायक रूखमोडे, गोंदिया आरपीएफचे निरीक्षक भोलानाथ सिंह, स्थानक सल्लागार समितीचे सदस्य अपूर्व अग्रवाल, स्थानक व्यवस्थापक ए.एच. चौधरी, नगरसेवक शकील मंसुरी, दिगंबर जैन, विनोद जैन, डॉ. प्रभात शर्मा, चिनू अजमेरा, पोलीस निरीक्षक मानिकचंद, ज्ञानेश्वर नालट, पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर व जैन समाजाचे नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी आ. अग्रवाल म्हणाले, गोंदिया शहरात शक्यतो अशा प्रकरचे हे पहिलेच प्रकरण आहे. यात रेल्वेच्या स्थानिक संबंधित अधिकाºयांच्या निष्काळजीपणामुळे सदर महिलेचा मृत्यू झाला. घटनेनंतर पोहोचलेल्या मृतक महिलेच्या नातलगांसह उपस्थित पोलीस कर्मचारी व डॉक्टरांचा व्यवहार अशिष्ट होता. या प्रकरणाची चौकशी योग्यरित्या व्हावी, त्यामुळे घटनेचे निष्कर्ष समजू शकतील. रेल्वे अधिकाºयांच्या उपस्थितीत आमदार अग्रवाल यांनी वैद्यकीय अधिकारी व संबंधित इतर अधिकाºयांवर कठोर कारवाईची मागणी केली.
यावर ए.के. स्वामी, निलेश राऊत, डी.एस. तोमर व डॉ. सुंगधा यांनी सांगितले, विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून एस.एस. टेंभुर्णे यांच्याविरूद्ध चार्जशिट दाखल करण्यात आली आहे. तसेच जीआरपीच्या काही अधिकाºयांवरसुद्धा कारवाई अपेक्षित आहे. या वेळी आ. अग्रवाल यांच्या निर्देशावर डीन डॉ. रूखमोडे व उत्तरीय तपासणी करणारे अधिकारी डॉ. प्रभात शर्मा यांनी मृतक महिलेच्या उत्तरीय तपासणी संबंधात माहिती उपस्थितांना दिली.
याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित दिगंबर जैन समाजाचे ट्रस्टी सीए विनोद जैन, स्थानक सल्लागार समितीचे सदस्य अपूर्व अग्रवाल, नगरसेवक शकील मंसुरी, सुशांत जैन, देवेंद्र अजमेरा, रिंकू गुप्ता, संजय जैन यांनी आपली मते व्यक्त केले व योग्य चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. या वेळी संतोष जैन, सुधीर जैन, अनिल जैन, संदीप जैन, राजू जैन, अन्नी जैन, पप्पू जैन, कल्लू जैन, सुरेंद्र जैन, मयंक जैन यांच्यासह अनेक गणमान्य उपस्थित होते.
गोपलानी हत्याकांडातील दोषींवर कारवाई करा
आ. गोपालदास अग्रवाल यांनी तुमसर येथे मृत आढळलेले गोंदियाचे युवा व्यावसायिक विक्की गोपलानी यांच्या हत्येबाबत माहिती घेतली. तसेच भंडारा येथील पोलीस अधीक्षक डॉ.विनीता शाहू यांच्याशी चर्चा करून दोषींना त्वरित अटक करण्याची मागणी केली. असे हत्याकांड घडवून आणणाºयांना कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही तसेच आरोपी लवकरच पोलीस प्रशासनाच्या ताब्यात असतील, असा विश्वास आ. अग्रवाल यांनी व्यक्त केला.