रेल्वे फाटक वाहतुकीला अडसर

By Admin | Updated: November 2, 2016 00:29 IST2016-11-02T00:29:53+5:302016-11-02T00:29:53+5:30

तिरोडा येथे अदानी विद्युत प्रकल्पामुळे या मार्गावर वर्दळ वाढली आहे. गोंदिया-तिरोडा मार्गावरील काचेवानी रेल्वे फाटकावर

Rail gate passenger traffic | रेल्वे फाटक वाहतुकीला अडसर

रेल्वे फाटक वाहतुकीला अडसर

काचेवानी : तिरोडा येथे अदानी विद्युत प्रकल्पामुळे या मार्गावर वर्दळ वाढली आहे. गोंदिया-तिरोडा मार्गावरील काचेवानी रेल्वे फाटकावर उड्डाणपूल नसल्याने वाहनचालकांना या ठिकाणी एक ते दीड तास थांबावे लागत आहे. याचा विद्यार्थी, नागरिक व रुग्णांनासुद्धा बरेचदा फटका सहन करावा लागतो.
काचेवानी रेल्वे फाटकावर उड्डाण पुलाअभावी वाहतुकीला अडसर निर्माण होते.
यामुळे काचेवानी येथे त्वरित उड्डाणपूल मंजूर करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ही समस्या मार्गी लावण्याकरिता या परिसतील नागरिकांना लोकप्रतिनिधी व अदानी प्रकल्पाकडे मागणी केली आहे. गोंदिया हे जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे तिरोडा येथील नागरिकांना नेहमी गोंदिया येथे ये-जा करावी लागते.
गोंदिया येथे उच्च शिक्षणाची सोय असल्यामुळे या ठिकाणी अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. मात्र बरेचदा रेल्वेफाटक बंद राहत असल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयाच्या वेळेत पोहचणे शक्य होत नाही. (वार्ताहर)

Web Title: Rail gate passenger traffic