बाक्टी येथील अवैध हातभट्टीवर धाड मोहफूल सडवा जप्त ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:28 IST2021-03-06T04:28:04+5:302021-03-06T04:28:04+5:30
बोंडगावदेवी : अवैध मोहफुलाच्या दारू विक्रीला अंकुश लागावा म्हणून अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव तोंदले यांनी आपल्या पोलीस ...

बाक्टी येथील अवैध हातभट्टीवर धाड मोहफूल सडवा जप्त ()
बोंडगावदेवी : अवैध मोहफुलाच्या दारू विक्रीला अंकुश लागावा म्हणून अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव तोंदले यांनी आपल्या पोलीस सहकाऱ्याच्या पथकास बाक्टी गावात विविध ठिकाणी धाडी घातल्या. तीन मोहफुलाच्या अड्ड्यावर धाड घालून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. मोहफुलाचा सडवा, मोहफुलाची दारू जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आली. या धाडीत एकूण ४७ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील बाक्टी येथील अवैधपणे सुरू असलेल्या मोहफुलाच्या हातभट्टीवर पोलीस निरीक्षक महादेव तोदले यांच्या नेतृत्वात धाड टाकली. हरिश्चंद्र शहारे (वय ५४) यांच्याकडून ४ लिटर मोहफुलाची दारू, १५५ किलो मोहफुलाचा सडवा, अशोक प्रभू शहारे (५०) यांच्या घरुन ४ लिटर मोहफुलाची दारू, १२५ किलो मोहफुलाचा सडवा, रतन उध्दव मेश्राम (५२) यांच्या घरुन २ लिटर हातभट्टी मोहफुलाची दारू, १७० किलो मोहफुलाचा सडवा जप्त करुन हातभट्ट्या नष्ट करण्यात आला. गावात ३ ठिकाणी धाड टाकून आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. अवैध मोहफुलाची हातभट्टी दारू, मोहफुलाचा सडवा (अंदाजे किंमत ४७ हजार रुपये) जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक रमेश बाबर, देवीदास कन्नाके, विजय कोटांगले, बोहरे, मुनेश्वर, रेहीवाले, कोसरे, गिऱ्हेपुंजे यांनी केली.