शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

फक्त कुत्राच नव्हे अन्य प्राणी चावल्यानेही होतो रेबीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 16:51 IST

नितीन वानखेडे : वेळीच आणि योग्य उपचार मिळाले तरच जीव वाचवता येतो

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : रेबीजबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी आणि लोकांना या प्राणघातक आजारापासून वाचवण्यासाठी दरवर्षी २८ सप्टेंबर रोजी जगभरात रेबीज दिन साजरा केला जातो. हा दिवस फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांची पुण्यतिथी आहे. ज्यांनी १८८५ मध्ये रेबीजची पहिली लस विकसित केली. आज ही लस प्राणी आणि मानव यांच्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्याचा वापर मानवांमध्ये रेबीजचा धोका कमी करू शकतो. यावर्षी १८ वा जागतिक रेबीज दिन साजरा केला जात आहे. रेबीज दिन दरवर्षी नवीन थीमसह साजरा केला जातो आणि यावर्षीची थीम 'ब्रेकिंग रेबीज बाउंड्रीज' म्हणजेच 'रेबीज सीमा तोडणे' असे आहे. रेबीज फक्त कुत्रा चावल्यानेच नव्हे, तर अन्य प्राणी चावल्यानेही होतो. यामुळे वेळीच आणि योग्य उपचार मिळाले तरच जीव वाचवता येतो, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी सांगीतले. 

रेबीजचा प्रसार प्रामुख्याने कुत्रा चावल्याने होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, रेबीज लाईसा विषाणूची लागण झालेल्या प्राण्यांच्या चाव्याद्वारे रेबीजचा संसर्ग मानवांमध्ये होतो. हा एक झुनोटिक रोग आहे जो संक्रमित मांजरी, कुत्रे, माकड आणि वटवाघूळ यांच्या चाव्याद्वारे मानवांमध्ये संक्रमित होऊ शकतो. यामुळे मेंदूला सूजदेखील येऊ शकते. असे मानले जाते की, ९९ टक्के प्रकरणांमध्ये रेबीजचा संसर्ग कुत्र्यांमुळे मानवांमध्ये होतो.

हे करावे कुत्रा किंवा इतर प्राणी चावल्यामुळे झालेली जखम साबण आणि नळाच्या वाहत्या पाण्याने स्वच्छ धुवा. जखमेला निर्जंतुक मलम लावा. ताबडतोब शासकीय दवाखान्यात जा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने रेबीज- विरोधी लस घ्या. लसीच्या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करा. आपल्या घरातील पाळीव प्राण्यांचे वेळोवेळी रेबीजविरोधी लसीकरण करा.

हे करू नयेजखमेला मिरची, तेल, चुना असे कोणतेही घातक पदार्थ लावू नयेत.

रेबीज म्हणजे काय आणि त्याचे कारण काय? रेबीज हा एक गंभीर विषाणूजन्य संसर्ग आहे जो रँबडोव्हायरस कुटुंबातील आरएबीव्ही विषाणूमुळे होतो. रेबीजचा संसर्ग एखाद्या संक्रमित प्राण्याच्या लाळेतून होतो जेव्हा तो दुसऱ्या व्यक्तीला किंवा प्राण्याला चावतो किंवा ओरखडतो. कारण हा रोग संक्रमित व्यक्तीच्या मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम करतो, तो त्वरित रोखणे आवश्यक आहे.

रेबीजचे उपचार कोण आणि केव्हा करावे ?रेबीजची लस मारलेल्या रेबीज विषा- णूपासून विकसित केली जाते, ज्यामुळे रोग होऊ शकत नाही. मानवांना रेबीजची लस दोन प्रकारे मिळते. पहिली म्हणजे प्रतिबंधात्मक लस (संसर्ग नसलेली) आणि दुसरी उपचारात्मक रेबीज लसीकरण. 

"मांजर, माकडे, वटवाघूळ अशा सर्वच प्राण्यांपासून रेबीजचा धोका असतो. त्यामुळे पाळीव प्राण्यांचे वेळेत लसीकरण करून घ्यावे. अन्यथा तुमच्या टॉमी किंवा मांजराने चावा घेतल्यावरही होण्याची शक्यता आहे." - डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी

 

टॅग्स :gondiya-acगोंदिया