‘त्या’ शाळेची मान्यता त्वरीत रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:00 IST2020-07-25T05:00:00+5:302020-07-25T05:00:44+5:30

आरटीई अंतर्गत शासन नियमाप्रमाणे २५ टक्के विद्यार्थ्यांना खासगी नामांकित शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. प्रवेश देण्यात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क शासनाकडून शालेय प्रशासनाला प्राप्त होते. मात्र, येथील जेएमव्ही शाळेत विराज पृथ्वीराज रामटेके या विद्यार्थ्याचा आरटीई अंतर्गत प्रवेश असून सुद्धा त्याच्या पालकांकडून १६ हजार ४०० रूपये शिक्षण शुल्क घेण्यात आले.

Quickly de-recognize 'that' school | ‘त्या’ शाळेची मान्यता त्वरीत रद्द करा

‘त्या’ शाळेची मान्यता त्वरीत रद्द करा

ठळक मुद्देएनएसयुआयची मागणी : जेएमव्ही शाळेसमोर केली निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत शिक्षण घेता यावे, या अनुषंगाने आरटीई अंतर्गत शासनामार्फत शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. मात्र, येथील जेएमव्ही शाळा प्रशासनाने आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून अवैधरित्या शिक्षण शुल्क आकारणी करून वसुली केली. याबाबतची तक्रार केली असता झालेली चुकही शालेय प्रशासनाने मान्य केली. मात्र, या प्रकरणाला घेवून शिक्षण विभागाने कसलीही कारवाई न केल्याने एनएसयुआयच्यावतीने जिल्हाध्यक्ष हरीश तुळसकर यांच्या नेतृत्वात बुधवारी जेएमव्ही शाळेसमोर निदर्शने करण्यात आले.
आरटीई अंतर्गत शासन नियमाप्रमाणे २५ टक्के विद्यार्थ्यांना खासगी नामांकित शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. प्रवेश देण्यात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क शासनाकडून शालेय प्रशासनाला प्राप्त होते. मात्र, येथील जेएमव्ही शाळेत विराज पृथ्वीराज रामटेके या विद्यार्थ्याचा आरटीई अंतर्गत प्रवेश असून सुद्धा त्याच्या पालकांकडून १६ हजार ४०० रूपये शिक्षण शुल्क घेण्यात आले.
दरम्यान शासनाकडून शिक्षण शुल्क प्राप्त झाल्यावर त्यातील निम्न रक्कम परत करण्यात आली. या बाबीची तक्रार पालकांनी केली असता दखल घेत एनएसयुआयच्यावतीने शिक्षणाधिकाऱ्यांकडे जेएमव्ही शाळा प्रशासनाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.
यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शालेय प्रशासनाला खुलासा मागितला असता त्यांनी माहिती नसल्याने चूक झाल्याची कबूली दिली. एवढेच नव्हे तर यापुढे अशी चुक करणार नाही, असेही लेखी आश्वासन दिले. मात्र शिक्षण विभागाकडून संबंधित शाळा प्रशासनावर कसलीही कारवाई करण्यात आली नाही. दरम्यान शालेय प्रशासनाच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्यात यावी, शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी, आरटीई अंतर्गत केलेल्या शिक्षण शुल्क नावावर केलेल्या घोटाळ््याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनी लावून धरली होती.
या आंदोलनात एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष हरीश तुळसकर, युवक कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष आलोक मोहंती यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Quickly de-recognize 'that' school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा