शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

रेड झोनमधून येणाऱ्यांना क्वारंटाईन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 05:00 IST

सध्या सर्वत्र कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव वाढ आहे. त्यातच मागील ३९ दिवसांपासून कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात दोन कोरोना बाधीत रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाहेरील जिल्हा आणि राज्यातून येणाºया नागरिकांपासून कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर आता प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपयायोजना करण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देगटविकास अधिकाऱ्यांनी काढले फर्मान : कक्षाचे फोटोही मागविले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मंगळवारी दोन कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यानंतर याचा फटका बसताच आता प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. गटविकास अधिकाºयांनी मंगळवारी यासंदर्भात एक पत्रक काढून रेड झोनमधून येणाºया नागरिकांना गावातील शाळांमध्ये क्वारंटाईन करुन ठेवण्याचे निर्देश दिले आहे.सध्या सर्वत्र कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव वाढ आहे. त्यातच मागील ३९ दिवसांपासून कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात दोन कोरोना बाधीत रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाहेरील जिल्हा आणि राज्यातून येणाºया नागरिकांपासून कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर आता प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपयायोजना करण्यास सुरुवात केली आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी गावात रेड झोनमधून येणाºया नागरिकांना गावातील जि.प.व खासगी शाळा, वसतिगृृह इमारतींमध्ये क्वारंटाईन करुन ठेवण्याची व्यवस्था करण्याची निर्देश दिले आहे. क्वारंटाईन कक्षाच्या ठिकाणी वीज,पाणी, आंघोळीकरिता लागणारे पाणी, शौचालयाची व्यवस्था असेल अशा इमारतीची निवड करावी. तसेच क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांनाच्या जेवणाची व राहण्याकरिता लागणाºया साहित्याची व्यवस्था ही कुटुंबातील व्यक्ती करतील असे निर्देश दिले आहे.क्वारंटाईन कक्षाचे फोटो व्हॉट्सअ‍ॅपवरजिल्ह्यात बाहेरुन येणाºया स्थलांतरित मजुरांकडे दुर्लक्ष करणे प्रशासनाला भोवल्यानंतर आता उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. गाव स्तरावर क्वारंटाईन कक्ष स्थापन करुन रेड झोनमधून येणाºया त्या कक्षात ठेवण्याचे निर्देश सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांना दिले आहे. तसेच क्वारंटाईन कक्ष स्थापन केल्यानंतर त्याचे फोटो काढून व्हॉटसअ‍ॅपवर पाठविण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या