क्वारंटाईन सेंटर व कंटेन्मेंट झोन वगळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 05:00 IST2020-06-08T05:00:00+5:302020-06-08T05:00:29+5:30
जिल्ह्यात ६० हून अधिक कोरोन रूग्ण आढळून आले होते व देवरी तालुका सोडून अन्य सातही तालुक्यातील आहेत. शिवाय बाहेरून व्यक्तींना आलेल्या व्यक्तींना जिल्हा परिषदेच्या शाळांत क्वारंटाईन करण्यात आले आहे. असे एकूण ६४१ क्वारंटाईन सेंटर आहेत. तर रूग्ण आढळल्याने सध्यातरी २२ कंटोनमेंट झोन आहेत. त्यामुळे या गावांतील शाळांना वगळण्यात येणार आहे.

क्वारंटाईन सेंटर व कंटेन्मेंट झोन वगळणार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : २६ तारखेलाच शाळेचा ठोका वाजविण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाची तयारी सुरू आहे. त्यानुसार, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने आपली तयारी केली असून ते २६ तारखेलाच शाळेचा ठोका वाजविण्यासाठी सज्ज आहे. यात मात्र, जिल्ह्यात क्वारंटाईन सेंटरसाठी दिलेल्या ६४१ शाळा तसेच कंटोनमेंट झोनमध्ये असलेल्या गावांतील शाळांना वगळण्यात येणार आहे.
२६ जून पासून नवीन शैक्षणिक सत्राची सुरूवात होत असून जिल्हा परिषद शाळांचाही ठोका त्याच दिवशी वाजतो. यंदा मात्र कोरोनामुळे सर्वच व्यवस्था विस्कटलेली दिसत असून शाळा कधी सुरू होणार व कधी सुरू करायच्या याबाबत चित्र स्पष्ट झालेले नाही.
त्यामुळे शिक्षण विभाग व पालक दोघे संभ्रमात आहेत. मात्र राज्याच्या शिक्षण विभागाकडून आदेश येतील तेव्हा येतील. परंतु येथील माध्यमिक शिक्षण विभागाने आपली तयारी करून ठेवली असून २६ तारखेलाच शाळेचा पहिला वाजविण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग सज्ज आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एक हजार ६६२ प्राथमिक शाळा असून यंदा दोन लाक २८ हजार ५८४ एवढी विद्यार्थी संख्या आहे. त्यानुसार, प्राथमिक शिक्षण विभागाने आपले नियोजन करून घेतले आहे.
शासनाने विदर्भात २६ जून तर उर्वरित महाराष्ट्रात १५ जूनपासून शाळा सुरू करण्यास तयारी दर्शविली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने सज्ज असणे गरजेचे असल्याने प्राथमिक शिक्षण विभागाने पूर्ण तयारी करून ठेवली आहे.
क्वारंटाईन सेंटर व कंटेन्मेंट झोनमधील शाळांना सुट
जिल्ह्यात ६० हून अधिक कोरोन रूग्ण आढळून आले होते व देवरी तालुका सोडून अन्य सातही तालुक्यातील आहेत. शिवाय बाहेरून व्यक्तींना आलेल्या व्यक्तींना जिल्हा परिषदेच्या शाळांत क्वारंटाईन करण्यात आले आहे. असे एकूण ६४१ क्वारंटाईन सेंटर आहेत. तर रूग्ण आढळल्याने सध्यातरी २२ कंटोनमेंट झोन आहेत. त्यामुळे या गावांतील शाळांना वगळण्यात येणार आहे.
शाळा व्यवस्थापन समित्यांना अधिकार
शिक्षण विभागाने २६ जूनपासून शाळा सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याचे कळत असले तरिही आपल्या गावातील शाळा उघडायची की नाही याबाबतचे अधिकार गावस्तरावर शाळा व्यवस्थापन समित्यांना देण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कित्येक पालक आपल्या अपत्यांना शाळेत पाठविण्याच्या मानसिकतेत नाहीत. अशात शाळा व्यवस्थापन समित्यांना सभा घेऊन काय करायचे हे ठरवायचे आहे अशी माहिती आहे.