लक्षणे दिसताच क्वारंटाईन करा अन मोकळे व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 05:00 IST2020-08-14T05:00:00+5:302020-08-14T05:00:44+5:30

गोंदिया शहरात चार ते पाच ठिकाणी क्वारंटाईन आणि कोविड केअर स्थापन करण्यात आले आहे. बुधवारी (दि.१२) सायंकाळी गोंदिया फुलचूर येथील तंत्रनिकेत विद्यालयाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल नागरिकांना शिळे व निकृष्ट दर्जाचे जेवण देण्यात आले. त्यामुळे येथील नागरिकांनी यावरुन चांगलाच गोंधळ घातला. सकाळचा नास्ता सुध्दा तोच तोच दिला जात असून वरण म्हणजे केवळ दाळीचे पाणीच असते. तर भाजी खाण्यायोग्य नसते.

Quarantine and relax as soon as symptoms appear | लक्षणे दिसताच क्वारंटाईन करा अन मोकळे व्हा

लक्षणे दिसताच क्वारंटाईन करा अन मोकळे व्हा

ठळक मुद्देसोयी सुविधांचा पूर्णपणे अभाव : क्वारंटाईन केंद्राच्या दररोज तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात बाहेरुन येणाऱ्या आणि कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन केंद्रात ठेवले जात आहे. मात्र नागरिकांना क्वारंटाईन केंद्रात ठेवल्यानंतर त्यांना सोयी सुविधा मिळत आहेत किंवा नाही हे बघण्याची जवाबदारी आरोग्य आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची आहे. मात्र ते आपली जवाबदारी झटकत असून केवळ नागरिकांना क्वारंटाईन कक्षात ठेवा आणि मोकळे व्हा असा प्रकार प्रशासनाचा सुरू आहे. त्यामुळे क्वारंटाईन केंद्र सुविधा केंद्र होण्याऐवजी असुविधा केंद्र झाले आहे.
गोंदिया शहरात चार ते पाच ठिकाणी क्वारंटाईन आणि कोविड केअर स्थापन करण्यात आले आहे. बुधवारी (दि.१२) सायंकाळी गोंदिया फुलचूर येथील तंत्रनिकेत विद्यालयाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल नागरिकांना शिळे व निकृष्ट दर्जाचे जेवण देण्यात आले. त्यामुळे येथील नागरिकांनी यावरुन चांगलाच गोंधळ घातला. सकाळचा नास्ता सुध्दा तोच तोच दिला जात असून वरण म्हणजे केवळ दाळीचे पाणीच असते. तर भाजी खाण्यायोग्य नसते. त्यामुळे क्वारंटाईन सेंटर म्हणजे याचना सेंटर झाले असून यापेक्षा आम्ही आमच्या घरी अधिक सुरक्षित असल्याचे सांगत प्रशासनावर रोष व्यक्त केला. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ तयार करुन जिल्हाधिकाºयांना सुध्दा पाठविण्यात आला. क्वारंटाईन सेंटरच्या तक्रारीत दररोज वाढ होत आहे. तर मेडिकल आणि बीजीडब्ल्यू रुग्णालयात सुध्दा समस्या कायम आहे.सरांडी, तिरोडा, गोंदिया, आमगाव येथील कोविड केअर सेंटर आणि क्वारंटाईन केंद्रातील समस्येत वाढ होत आहे. विशेष म्हणजे आमगाव येथील कोविड केअर सेंटरमधून एक वृध्द गायब झाला. यावरुन आरोग्य विभागाची यंत्रणा किती सजगपणे काम करित आहे हे दिसून येते. क्वारंटाईन सेंटरमध्ये योग्य सोयी सुविधा मिळत असल्याने येथे कुणीही राहण्यास तयार नाही. दुसरीकडे जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे ही समस्या अधिक बिकट होवू शकते.

पुरावे सादर केल्यानंतर कारवाईस कुचराई का
तिरोडा तालुक्यातील सरांडी आणि गोंदिया येथील तंत्रनिकेतन विद्यालयातील क्वारंटाईन सेंटरमधील असुविधा आणि त्यांना दिल्या जात असलेल्या निकृष्ट जेवणाचा व्हिडिओ तयार करुन तसेच याची लेखी तक्रार जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली. पण अद्यापही कुठलीच कारवाई करण्यात आली नाही.त्यामुळे येथील असुविधा कायम आहे. पुराव्यासह तक्रार करुन सुध्दा त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे जिल्ह्यात या सर्व गोष्टंीवर वचक लावणार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दखल घेणार कोण ?
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यातच दररोज एका क्वारंटाईन केंद्र आणि कोविड केअर सेंटरची तक्रार पुढे येत आहे. बुधवारी गोंदिया येथील तंत्रनिकेतनच्या क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांनी येथील असुविधांची चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल केली. प्रशासन याची दखल घेत नसून लोकप्रतिनिधी याची दखल कधी घेणार असा सवाल आहे.

Web Title: Quarantine and relax as soon as symptoms appear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.