शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

हयातीच्या दाखल्यांसाठी वृद्ध व दिव्यांगांची सोय करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:29 IST

गोंदिया : श्रावणबा‌ळ व संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींना दरवर्षी हयातीचा दाखला व अन्य कागदपत्र जमा करावे लागतात. अशात ...

गोंदिया : श्रावणबा‌ळ व संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींना दरवर्षी हयातीचा दाखला व अन्य कागदपत्र जमा करावे लागतात. अशात वृद्ध, अपंग, लकवा, अंध, गतिमंद, जे स्वतः हून चालू शकत नाहीत अशा लाभार्थींची अडचण होते. याकरिता अशा लाभार्थींच्या घरी कर्मचारी पाठवून लाभार्थींची सोय करून द्यावी, अशी मागणी ग्रामविकास संघटक सुरेंद्र गेडाम यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन केली आहे.

श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्तिवेतन योजना व संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत निराधार, वृद्ध महिला-पुरुष, अपंग, विधवा, अविवाहित, कुष्ठरोग, सिकलसेल, परितक्त्या, मूकबधिर लाभार्थींना शासनाकडून प्रतिमहिना एक हजार रुपये अनुदान देण्यात येते. त्याकरिता लाभार्थींकडून जीवन प्रमाणपत्र ( हयातीचा दाखला) जमा करण्याची ३० जून ही शेवटची तारीख असल्याने लाभार्थींना आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार), बँक खाते, रेशन कार्ड हे कागदपत्र घेऊन संबंधित तलाठी कार्यालयात देण्याकरिता तालुक्यातील वृद्धांची चांगलीच पंचाईत होत आहे. योजनेतील लाभार्थींना कागदपत्र तयार करून संबंधित तलाठी कार्यालयात बोलाविण्यात आले आहे. तालुक्यात श्रावणबाळ योजनेचे १३,००० व‌ संजय गांधी निराधार योजनेचे १०,००० लाभार्थी असून असे अनेक वृद्ध, अपंग, लकवा, अंध, गतिमंद आहेत की जे स्वतः हून चालू शकत नाहीत. एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तर दुसरीकडे आयच्या नावाने सेतूचालकांकडून आर्थिक लूट होत असल्याची माहिती आहे. त्याचा फटका ज्येष्ठांना बसत आहे. वृद्ध स्त्री-पुरुषांची दयनीय स्थिती लक्षात घेता दस्तूरखुद्द लाभार्थींच्या घरी जाऊन त्यांना लाभ देणे प्रशासकीय यंत्रणेला का शक्य नाही, त्यावरील उपाय विभागाने का शोधले नाही, यात एखाद्या लाभार्थींचा मृत्यू झाल्यास त्याला जबाबदार कोण, अशी चर्चा नागरिकांत सुरू आहे. शासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका ज्येष्ठांना बसत असून, जे लाभार्थी चालू शकत नाही किंवा अत्यंत आजारी आहेत, त्यांना जीव मुठीत घेऊन कार्यालय गाठावे लागत आहे. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे.

....

कर्मचाऱ्यांना लाभार्थींच्या घरापर्यंत पाठवा

श्रावणबाळ व संजय गांधी निराधारांच्या संपूर्ण लाभार्थींना हयातीचा दाखला भरावयाची शेवटची तारीख व लागणारे कागदपत्र याबद्दल लेखी माहिती देऊन व वृद्ध, अपंग, लकवा, अंध, गतिमंद जे स्वतः हून चालू शकत नाहीत अशा लाभार्थींच्या घरी पाठवून लाभ द्यावा, अशी मागणी गेडाम यांनी केली आहे.