लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील जिल्हा रूग्णालयसह जिल्ह्यातील ग्रामीण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात अद्ययावत आरोग्य सुविधा उपलब्ध करवून देण्यात याव्या अशी मागणी कॉँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव अमर वराडे यांनी केली आहे. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांना निवेदन दिले आहे.येथील केटीएस जिल्हा रूग्णालय, बाई गंगाबाई महिला व बाल रूग्णालय शिवाय ग्रामीण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मोठ्या संख्येत रूग्ण उपचारासाठी येतात. मात्र सद्यस्थितीत डॉक्टरांसह आरोग्य कर्मचारी कोविड-१९ या विषाणूवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेत व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत अन्य आजारांच्या रूग्णांकडे दुर्लक्ष होत आहे. काही रूग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अद्ययावत सोयी सुविधा नाहीत. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या रु ग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण आणि आता उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांमुळे रु ग्ण संख्येत मोठी वाढ होत आहे. कोविड-१९ मुळे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि पायाभूत सुविधा कोविड-१९ च्या उपचार घेणाऱ्या रूग्णांकरीता राखीव केली आहे.अशा परिस्थितीत दूर अंतरावरून येथील रूग्णालयात उपचाराची अपेक्षा घेऊन येणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. आदिवासी बहूल, नक्षल प्रभावित जिल्ह्यातील जनता आधीच आर्थिक संकटात आहे. त्यात अनेक शासकीय रूग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून अनेक अद्ययावत सोयी सुविधा नसल्याने त्यांच्या समस्येत आणखी भर पडत आहे. या सर्वसोयी शासकीय रूग्णालयांमध्ये उपलब्ध करण्याची मागणी वराडे यांनी केली. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक रूखमोडे यांना निवेदन दिले व चर्चा केली.यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सूर्यप्रकाश भगत, शहर काँग्रेसचे महासचिव अरूण गजभिये, युथ काँग्रेस जिल्हाध्यक्ष आलोक मोहंती, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष हरिष तुळकर, ओबीसी विभागाचे तालुकाध्यक्ष सुशिल खरखाटे, एनएसयुआय गोंदिया विधानसभा क्षेत्र अध्यक्ष बाबा बागडे, दलेश नागदवणे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
रूग्णालयांत अद्ययावत आरोग्य सुविधा उपलब्ध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:00 IST
आदिवासी बहूल, नक्षल प्रभावित जिल्ह्यातील जनता आधीच आर्थिक संकटात आहे. त्यात अनेक शासकीय रूग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून अनेक अद्ययावत सोयी सुविधा नसल्याने त्यांच्या समस्येत आणखी भर पडत आहे. या सर्वसोयी शासकीय रूग्णालयांमध्ये उपलब्ध करण्याची मागणी वराडे यांनी केली. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक रूखमोडे यांना निवेदन दिले व चर्चा केली.
रूग्णालयांत अद्ययावत आरोग्य सुविधा उपलब्ध करा
ठळक मुद्देअमर वराडे : कॉँग्र्रेस कमिटीकडून जिल्हाधिकाऱ्यांना दिले मागण्यांचे निवेदन